शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

आठ वर्षानंतर गडचिरोलीत पोलीस अधिकाऱ्याला वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 5:00 AM

आतापर्यंत नक्षली हिंसाचारात पोलीस कर्मचारी बळी पडण्याच्या घटना अनेक झाल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या घटना मोजक्याच आहेत. त्यात रविवारच्या घटनेची भर पडली. यापूर्वी ८ वर्षाआधी म्हणजे २४ मार्च २०१२ रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ३ उपनिरीक्षकांसह १० पोलीस कर्मचारी शहीद झाले होते.

ठळक मुद्देआतापर्यंत १९ अधिकारी शहीद : नक्षलविरोधी अभियानात १९२ पोलीस कर्मचारी ठरले नक्षली हिंसेचे बळी

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविताना रविवारी (दि.१७) एका तरुण पोलीस उपनिरीक्षकासह एका जवानाला वीरमरण आले. आठ वर्षाच्या कालावधीनंतर नक्षलविरोधी अभियानात पोलीस अधिकाऱ्याचा बळी गेला. यासोबतच नक्षली हिंसेत बळी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची संख्या १९ तर जवानांची संख्या १९२ वर पोहोचली आहे. आत्मसमर्पण आणि चकमकीत मरण पावणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्या वाढल्याच्या वैफल्यातून हे हिंसक कृत्य घडवून त्यांनी आणल्याचे दिसून येते.आतापर्यंत नक्षली हिंसाचारात पोलीस कर्मचारी बळी पडण्याच्या घटना अनेक झाल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या घटना मोजक्याच आहेत. त्यात रविवारच्या घटनेची भर पडली. यापूर्वी ८ वर्षाआधी म्हणजे २४ मार्च २०१२ रोजी धानोरा तालुक्यातील कारवाफाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ३ उपनिरीक्षकांसह १० पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. त्याआधी ४ ऑक्टोबर २०१० रोजी अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे नक्षल्यांनी आधी भूसुरूंग स्फोट घडवून नंतर गोळीबार केला होता. त्यात सीआरपीएफचे १ निरीक्षक, जिल्हा पोलीस दलाचे २ उपनिरीक्षक आणि एक जवान शहीद झाले होते. तत्पूर्वी ८ ऑक्टोबर २००९ रोजी भामरागड तालुक्यातील लाहेरीजवळ नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात जिल्हा पोलीस दलाच्या एका उपनिरीक्षकासह १६ कर्मचाऱ्यांना शहीद व्हावे लागले होते.आजच्या बंदला आदिवासींचा फलकातून विरोध२ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टीच्या जंगलात झालेल्या चकमकीत कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का पोलिसांच्या गोळीने ठार झाली होती. त्याचा निषेध म्हणून नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी पोस्टर, बॅनर्स लावून २० मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. परंतू आदिवासी विकास सेवा समितीने अनेक ठिकाणी नक्षलविरोधी पोस्टर लावून बंदचे आवाहन धुडकावले आहे.बदल्याची रणनितीदोन वर्षापूर्वी गडचिरोली पोलीस दलाने दोन दिवसात ४० नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्याचा बदला म्हणून गेल्यावर्षी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी जांभुळखेडाजवळ भूसुरूंग स्फोट घडविला. त्यात १५ जवानांना शहीद व्हावे लागले. काही दिवसांपूर्वीच जहाल नक्षली सृजनक्का हिचा पोलिसांच्या गोळीने वेध घेतला. त्याचा बदला म्हणून नक्षल्यांनी रविवारी पोलीस दलावर हल्ला करून दोघांचा बळी घेतला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीPoliceपोलिस