शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

आठ तालुके अजुनही पावसासाठी आसुसलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 5:00 AM

११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११३४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात १०५४.३ मिमी पाऊस झाला असून या पावसाची टक्केवारी ९२.९ मिमी आहे. यावर्षी सर्वाधिक १४३७.६ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १२५.६ टक्के आहे. त्या खालोखाल १४२३.९ मिमी पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ९२ टक्के पाऊस : केवळ चार तालुक्यांनी गाठली सरासरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत १२५४ मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी आतापर्यंतच्या पर्जन्यमानाची स्थिती पाहता सप्टेंबर अखेरपर्यंत पावसाची सरासरी गाठली जाणार की नाही, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. ११ सप्टेंबरपर्यंत पडणाऱ्या पावसाची तुलना केल्यास केवळ चार तालुक्यांनी ही सरासरी गाठल्याचे दिसत असून आठ तालुके अजुनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११३४.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात १०५४.३ मिमी पाऊस झाला असून या पावसाची टक्केवारी ९२.९ मिमी आहे. यावर्षी सर्वाधिक १४३७.६ मिमी पाऊस अहेरी तालुक्यात झाला आहे. आतापर्यंत या तालुक्यात पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १२५.६ टक्के आहे. त्या खालोखाल १४२३.९ मिमी पाऊस भामरागड तालुक्यात झाला आहे. या तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे पडणाºया पावसाचे प्रमाण पाहता पडलेला पाऊस १०७ टक्के आहे.सरासरी पडणाºया पावसाच्या तुलनेत आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १३८.९ टक्के पाऊस सिरोंचा तालुक्यात झाला आहे. प्रत्यक्षात तिथे झालेला पाऊस १३६४.९ मिमी आहे. याशिवाय मुलचेरा तालुक्यातही सरासरीच्या आसपास म्हणजे ९८.२ टक्के पाऊस झाला. या तालुक्यात प्रत्यक्षात पडलेला पाऊस १०९२.७ मिमी आहे.सध्या धानपीक गर्भात असून पिकाला पावसाची गरज आहे. पण गेल्या १० ते १५ दिवसांपासून तुरळक प्रमाणात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. सर्वसमावेशक पाऊस न झाल्यास अनेक ठिकाणी धानाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या तालुक्यात पावसाची गरजजिल्ह्यात सर्वात कमी पावसाचे प्रमाण गडचिरोली (६४.२ टक्के), देसाईगंज (६५.२), धानोरा (६६.७), कोरची (७३.८), आरमोरी (७८.८), कुरखेडा (८५.१), चामोर्शी (८६.७) आणि एटापल्ली (९०.५) या आठ तालुक्यांमध्ये आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या सुरूवातीपासून हे प्रमाण असेच कायम असल्यामुळे उरलेल्या मोजक्या दिवसात पावसाची कमतरता भरून निघण्याची शक्यता नाही. 

टॅग्स :Rainपाऊस