आठ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:03 IST2019-06-30T22:02:44+5:302019-06-30T22:03:00+5:30
अहेरी वरून सिरोंचाला जाणाऱ्या काळीपिवळी वाहनाला ट्रकने धडक दिली या धडकेत आठ प्रवाशी जखमी झाल्याची घटना जिमलगट्टा क्रॉसिंगजवळ रविवारी घडली.

आठ प्रवासी जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : अहेरी वरून सिरोंचाला जाणाऱ्या काळीपिवळी वाहनाला ट्रकने धडक दिली या धडकेत आठ प्रवाशी जखमी झाल्याची घटना जिमलगट्टा क्रॉसिंगजवळ रविवारी घडली.
एमएच ३३ एम ५०१२ क्रमांकाचा काळीपिवळी वाहन सिरोंचा कडे जात होता. तेलंगनावरून छत्तीसगडकडे जाणाऱ्या ट्रकने काळीपिवळी वाहनाला धडक दिली. या अपघातात छल्लेवाडा येथील दुर्गेश अंकलू बोरले (३२), सरिता महेश चालूरकर (२७), रा. खांदला, मनिषा सदानंद आदे (३०) रा.व्यंकटापूर, पोस्का सानते (३४) रा. महादेवपूर, सुमन तिरूपती रामटेके (३४) रा. बोरमपल्ली, प्रणय तिरूपती रामटेके, श्रीनिवास नागेश निमलवार रा. नागेपल्ली हे प्रवाशी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांची सुटी करण्यात आली.
लक्ष्मी व्यंकटी कणगूल(४०) हिच्या डोक्याला मार लागला आहे. तीला अहेरी येथील रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. सदर काळीपिवळी सिरोंचा तालुक्यातील रंगयापल्ली येथील संतोष सारमपल्ली यांच्या मालकीची आहे.