लाहेरी पोलिसांकडे आठ भरमार बंदुका सुपूर्द

By Admin | Updated: November 16, 2016 02:05 IST2016-11-16T02:05:47+5:302016-11-16T02:05:47+5:30

भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे १५ नोव्हेंबर सकाळी ८ वाजता सीआरपीएफ व पोलिसांच्या वतीने कम्युनिटी

Eight loads of guns were handed over to Laheri police | लाहेरी पोलिसांकडे आठ भरमार बंदुका सुपूर्द

लाहेरी पोलिसांकडे आठ भरमार बंदुका सुपूर्द

लाहेरीत मेळावा : नक्षल्यांना मदत न करता विकास कामांना सहकार्य करण्याची घेतली शपथ
लाहेरी : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे १५ नोव्हेंबर सकाळी ८ वाजता सीआरपीएफ व पोलिसांच्या वतीने कम्युनिटी पोलिसींग प्रोग्रामचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिकांनी आठ भरमार बंदूका पोलिसांच्या सुपूर्द केल्या आहेत.
पोलिसांच्या वतीने ग्रामीण भागात मेळावे घेऊन नागरिकांना भरमार बंदुका परत करण्याचे आवाहन केले जात आहे. याच उपक्रमांतर्गत लाहेरी पोलीस व सीआरपीएफ ३७ बटालियनच्या वतीने मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला लाहेरी परिसरातील ९२ गावकरी, पोलीस पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमारम्यान बिनागुंडा, तुर्रेमार्का, पुंगासूर गावातील नागरिकांनी आठ भरमार बंदूका पोलिसांकडे सुपूर्द केले. याच कार्यक्रमादरम्यान नागरिकांना नक्षलवाद्यांना समर्थन करणार नाही व सरकार तसेच पोलिसांच्या मार्फतीने केल्या जाणाऱ्या विकासकामांना अडथळा निर्माण केला जाणार नाही, अशी सपथ दिली. मेळाव्याला सीआरपीएफचे निरिक्षक अशोक कुमार, पर्यवेक्षक मोहम्मद फियास बेग, पोलीस उपनिरिक्षक सुधीर गाईगे, शिवराज हले उपस्थित होते.
मागील महिन्यांपासून पोलिसांच्या वतीने भरमार बंदूका वापस घेण्यासाठी मोहीम राबविली आहे. या मोहिमेला दुर्गम भागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत आजपर्यंत एकट्या भामरागड तालुक्यातील नागरिकांनी शेकडो बंदुका परत केल्या आहेत.याचा सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येईल, असे प्रतिपादन सुधीर गाईगे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Eight loads of guns were handed over to Laheri police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.