आठ आदर्श शिक्षकांच्या सत्कारासाठी अद्यापही मुहूर्त गवसला नाही

By Admin | Updated: November 27, 2014 23:35 IST2014-11-27T23:35:07+5:302014-11-27T23:35:07+5:30

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकदिनी ८ आदर्श शिक्षकांची निवड केली. मात्र दोन महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही या आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याचा मुहूर्त

Eight ideal teachers still do not have the majesty in their favor | आठ आदर्श शिक्षकांच्या सत्कारासाठी अद्यापही मुहूर्त गवसला नाही

आठ आदर्श शिक्षकांच्या सत्कारासाठी अद्यापही मुहूर्त गवसला नाही

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शिक्षकदिनी ८ आदर्श शिक्षकांची निवड केली. मात्र दोन महिन्याहून अधिक कालावधी लोटूनही या आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्याचा मुहूर्त जिल्हा परिषद प्रशासनाला अद्याप गवसलेला नाही. जि.प. प्रशासनाच्या या तुलघकी कारभाराविषयी शिक्षक मंडळीमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी शिक्षकांचा गौरव करून त्यांच्या प्रति उत्तराई होण्याचा हा सोहळा असतो. या दिवशी देशापासून ते गावापर्यंत विविध ठिकाणी गुरूजणांचा सत्कार करण्यात येते. गडचिरोली जिल्हा परिषदेने ५ सप्टेंबरला एकाही आदर्श शिक्षकाचा सत्कार केला नाही. मात्र सप्टेंबर महिन्यात उशिराने १२ पैकी केवळ ८ आदर्श शिक्षकांची निवड केली. या आदर्श शिक्षकांमध्ये गडचिरोली तालुक्यातील वसा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विलास नक्टूजी भांडेकर, आरमोरी येथील जि.प. शाळेचे शिक्षक गोपीनाथ तुकाराम नेवारे, देसाईगंज तालुक्यातील आमगाव जि.प. शाळेचे शिक्षीका सुनंदा बाबुराव पारटवार, कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा शाळेचे शिक्षक पुरंदर रामचंद्र चौधरी, चामोर्शी तालुक्यातील पेठतळा जि.प. शाळेचे शिक्षक वासुदेव आत्माराम कुनघाडकर, मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर जि.प. शाळेचे शिक्षक अनिल शंकर मार्तीवार, अहेरी तालुक्यातील वेलगुर जि.प. शाळेचे शिक्षक रमेश पांडूरंग कुसनाके, भामरागड तालुक्यातील धोडराज जि.प. शाळेचे शिक्षक लालदेव फकीराजी कोडापे यांची निवड करण्यात आली.
नोव्हेंबर महिना संपत आला असतानाही या आदर्श शिक्षकांचा अद्याप जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सत्कारही केलेला नाही. सप्टेंबर महिन्यानंतर आॅक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर हा कार्यक्रम होईल, असे गुरूजणांना वाटले. मात्र अद्यापही सत्काराची तारीख निश्चित न करण्यात आल्याने गुरूजणसुध्दा या सोहळ्याची प्रतीक्षा करीत आहे. एकूणच जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाच्या तुलघकी कारभारामुळे हा प्रसंग ओढावल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Eight ideal teachers still do not have the majesty in their favor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.