नव्या लागवड पद्धतीतून आर्थिक प्रगती शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:01 IST2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:01:12+5:30
पेरधान पेरणी ही यंत्राद्वारे केली जाते. या पद्धतीत बियाणे व खताच्या मात्रा एकाचवेळी देण्यात येते. त्यामुळे पेरणीच्या दिवसापासून रोप मजबूत होतात. या पद्धतीमुळे रोवणी, निंदन व वखरणी आदी कामांचा खर्च शेतकऱ्यांचा वाचतो. या पद्धतीमुळे बाह्य शेती मशागतीच्या खर्चाची बचत होते. त्यामुळे सदर यंत्राच्या सहाय्याने पेरणी करणे फायदेशीर असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

नव्या लागवड पद्धतीतून आर्थिक प्रगती शक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : पारंपरिक धान उत्पादन पद्धतीत बियाणे, पेरणी, लागवड आदीसाठी पैैसा व वेळ अधिक लागतो. मात्र त्या मानाने उत्पन्न कमी होते. धान पट्ट्यातील शेतकऱ्यांना कमी खर्चाची व जास्त नफ्याची शेती करायची असेल तर यांत्रिकी पद्धतीने परभात पेरणी करावी, असे आवाहन नागपूर विभागीय कृषी अधीक्षक पी. टी. गोडघाटे यांनी केले.
गोडघाटे यांनी आरमोरी तालुक्यातील मानापूर, वडधा, कुरंडी आदी गावातील काही निवडक शेतकऱ्यांच्या शेताला भेटी दिल्या. नवी शेती कशी करायची याबाबत शेताच्या बांधावरच त्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान तालुका कृषी अधिकारी कार्यालय आरमोरीच्या वतीने यंत्राद्वारे परभात पेरणीची प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, तालुका कृषी अधिकारी टी. डी. ढगे, मंडळ कृषी अधिकारी संदीप ढोणे, मंडळ कृषी अधिकारी एन. जी. जाधवर, अविनाश हुकरे, कृषी सहायक पी. जी. मेश्राम, अमित केराम तसेच शेतकरी उपस्थित होते.
आरमोरी तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान विभागीय कृषी अधीक्षक गोडघाटे यांनी शेतकरी दुर्वेश भोयर यांच्या शेताला भेट दिली. येथे सीताफळ लागवड कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले.
मशागतीच्या खर्चाची बचत