गुड्डीगुडमच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला समस्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST2021-07-26T04:33:21+5:302021-07-26T04:33:21+5:30

गुड्डीगुडम पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत गुड्डीगुडम, निमलगुडम, झिमेला, तिमरम, मोसम, नंदीगाव आदी गावे येत असून या चार गावांची ...

Eclipse of problems at Guddigudam Veterinary Hospital | गुड्डीगुडमच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला समस्यांचे ग्रहण

गुड्डीगुडमच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला समस्यांचे ग्रहण

गुड्डीगुडम पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत गुड्डीगुडम, निमलगुडम, झिमेला, तिमरम, मोसम, नंदीगाव आदी गावे येत असून या चार गावांची लोकसंख्या २००० च्या जवळपास आहे. या परिसरात पशुधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. जसे गाय, बैल, बकरी, मेंढ्या, कोंबड्या आदी पाळीव प्राण्यांचे प्रमाण जास्त आहे. या परिसरात शेती व्यवसायासोबतच पशुपालनहीे करतात. पावसाळ्यात पशूंना अनेक प्रकारचे आजार जडत असतात. मुख्यतः पायखुरी तसेच लसीकरण करणे, पशूंना जखमेवर उपचार करणे, या उपचारासाठी स्वतंत्र दवाखाना इमारत असणे गरजेचे आहे. येथे पशूंना बांधून ठेवण्याकरिता साधने आवश्यक आहेत. परंतु गुड्डीगुडमचा पशुवैद्यकीय दवाखाना भाड्याच्या खोलीत चालत असल्याने उपचार साधने कमी आहेत. परिणामी उपचार करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्याच्या परिस्थितीत पशुवैद्यकीय दवाखान्यात श्रेणी - २ चे डाॅक्टर उपलब्ध असून पशुधन विकास अधिकारी पद रिक्त असून या एकाच डाॅक्टरच्या भरवशावर दवाखाना चालतो. करिता येथे त्वरित पशुधन विकास अधिकारी पद भरण्यात यावे, स्वतंत्र इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पशुपालक व गावकऱ्यांकडून होत आहे.

बाॅक्स

पावसाळापूर्व प्रतिबंधक लसीकरण नाही

श्रेणी एकचे पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने पावसाळापूर्वीचे प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले नाही. कारण पावसाळ्याच्या दिवसात विविध संसर्गजन्य रोग उत्पत्ती होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला लसीकरण मोहीम राबवावी लागते. मात्र रिक्त पदांचे ग्रहण लागले असल्याने यावर्षी लसीकरण मोहीम राबविण्यात आली नाही. त्यामुळे पशुधन संकटात सापडले आहे. तरी त्वरित प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात यावे व रिक्त पद भरण्यात यावे, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

250721\1347-img-20210725-wa0014.jpg

केज तालुक्यातील पावनधाम येथील संत तुकोबारायांच्या गाभाऱ्यात गुरु पौर्णिमा निमित्त एकवीस हजार पानांची सजावट करण्यात आली होती.

Web Title: Eclipse of problems at Guddigudam Veterinary Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.