अहेरीत साजरी झाली इको फ्रेंडली होळी
By Admin | Updated: March 8, 2015 01:02 IST2015-03-08T01:02:32+5:302015-03-08T01:02:32+5:30
स्थानिक धर्मराव कृषी विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नैसर्गिक रंग तयार करून इको फ्रेंडली होळी साजरी केली.

अहेरीत साजरी झाली इको फ्रेंडली होळी
अहेरी : स्थानिक धर्मराव कृषी विद्यालयाच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नैसर्गिक रंग तयार करून इको फ्रेंडली होळी साजरी केली.
राष्ट्रीय हरित सेनेचे प्रमुख जयश्री खोंडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी पळसाची फुले, पालक, बीट, हळद, नीळ या नैसर्गिक पदार्थापासून नैसर्गिक रंग तयार केले. त्यानंतर अहेरी राजनगरीत शिक्षक, विद्यार्थी व गावकऱ्यांनी मिळून इको फ्रेंडली होळी साजरी केली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेले नैसर्गिक रंग अहेरी राजनगरीत, शासकीय कार्यालयात देण्यात आले. धर्मराव कृषी विद्यालयाचे प्राचार्य अनिल कत्रोजवार यांनी बाजारातील रासायनिक रंग व विद्यार्थ्यांनी तयार केलेले नैसर्गिक रंग याविषयी मार्गदर्शन केले. बाजारातील रासायनिक रंगामुळे शरीरावर परिणाम होतो. रासायनिक रंगाचा वापर अधिक केल्यास आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी नैसर्गिक रंगाचा वापर करून पर्यावरणपुरक होळी साजरी करावी, असे सांगितले.
यावेळी शाळेचे पर्यवेक्षक सुधाकर ताजणे, क्रिष्णा मंचार्लावार, सुधीर फरकाटे, साक्षी वरगंटीवार, श्वेता कासनगोटूवार, भक्ती भोपडे, पूजा काकडे आदी उपस्थित होत्या.