साल्हे येथे बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:01 IST2017-12-11T00:01:04+5:302017-12-11T00:01:27+5:30

कोरची तालुक्यातील कोटगूल पासून चार किमी अंतरावर असलेल्या साल्हे गावाजवळच्या तलावात ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला.

Dysfunctional death of leopard | साल्हे येथे बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

साल्हे येथे बिबट्याचा संशयास्पद मृत्यू

आॅनलाईन लोकमत
कोरची : कोरची तालुक्यातील कोटगूल पासून चार किमी अंतरावर असलेल्या साल्हे गावाजवळच्या तलावात ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बिबट्याचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ माजली आहे.
साल्हे गावापासून ५०० किमी अंतरावर तलाव आहे. या तलावातच बिबट्या मृतावस्थेत पडून असल्याचे गावातील नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी सदर माहिती वनाधिकाºयांना दिल्यानंतर वनाधिकाºयांनी पंचनामा केला. त्याच्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा मार दिसून आला नाही. त्याचबरोबर तलावाच्या पाण्यातही विष आढळले नाही. त्यामुळे बिबट्याचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला. याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाºयांना लावणे कठीण झाले आहे.

Web Title: Dysfunctional death of leopard