शाळा व्यवस्थापन सदस्यांना कर्तव्यांचे धडे
By Admin | Updated: February 7, 2015 00:52 IST2015-02-07T00:52:30+5:302015-02-07T00:52:30+5:30
शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना त्यांचे अधिकार व कर्तव्य तसेच जबाबदाऱ्या याविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने प्रशिक्षणाचा पहिला टप्पा नुकताच जिल्ह्यात पार पडला.

शाळा व्यवस्थापन सदस्यांना कर्तव्यांचे धडे
अहेरी/ देसाईगंज : शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना त्यांचे अधिकार व कर्तव्य तसेच जबाबदाऱ्या याविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने प्रशिक्षणाचा पहिला टप्पा नुकताच जिल्ह्यात पार पडला.
गटसाधन केंद्र अहेरी अंतर्गत अहेरी केंद्रातील शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कायद्यातील कलम २१ ‘अ’ नुसार शाळा व्यवस्थापन समितीची रचना व गठण, सदस्यांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या, भूमिका, योगदान याविषयी केंद्रप्रमुख नामदेव चालूरकर, प्रकाश दुर्गे, श्रीकांत राऊत यांनी मार्गदर्शन केले. अहेरी केंद्रांतर्गत जि. प. शाळा बामणी, चेरपल्ली, गडअहेरी, किष्टापूर, अबमपल्ली, व्यंकटरावपेठा, कोत्तागुड्डम, चिंचगुंडी, कोलुर तसेच भुजंगरावपेठा, किष्टापूर येथील खासगी शाळांमध्ये सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
देसाईगंज नगर परिषदेंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. न. प. शाळा भगतसिंग वार्ड, कुथे पाटील कॉन्व्हेंट, न. प. शाळा जुनी वडसा, गट साधन केंद्र येथे कार्यक्रम घेण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीची पूनर्रचना करण्यात आली असून महिलांना ५० टक्के प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. प्रशिक्षणाची सुरूवात केंद्रप्रमुख विजय बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी नगर सेविका आशा राऊत, आबीद अली सय्यद, शाळा समितीचे अध्यक्ष रत्नपाल कार, लतीफ शेख, भगवान शेंडे, डॉ. सूर्यप्रकाश गभणे, प्रवीण रामटेके, होमाबाई शहारे, अल्का सोनेकर, मुख्याध्यापक बाळकृष्ण मेश्राम, इमरान पठाण, राजेंद्र मातेरे, मुजाहिद पठाण, धनंजय गायवाड, आर. सी. डोंगरे, किशोर चव्हाण, यांनी सहकार्य केले.
समूह साधन केंद्र कुरूड यांच्या वतीने शाळा व्यवस्थापन सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. केंद्रांतर्गत कुरूड, शिवराजपूर, कोकडी, फरी, कोंढाळा येथे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी पं. स. सभापती परसराम टिकले, मुख्याध्यापक नीलकंठ चावरे, राजेंद्र शेंडे, मारोती दोनाडकर, मुलकलवार, विलास ठाकरे, अरविंद घुटके उपस्थित होते.