परीक्षा काळात तरी एस.टी. सुरळीत हाेणार की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST2022-03-03T05:00:00+5:302022-03-03T05:00:30+5:30

 परिसरातील चार ते पाच शाळांसाठी एक परीक्षा केंद्र राहणार असल्याने ९ ते १० कि.मी. अंतर गाठून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. परीक्षेच्या कालावधीत तरी बससेवा सुरू हाेणार काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. बससेवा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने परीक्षा केंद्र गाठावे लागणार आहे. 

During the examination, however, S.T. Will it go smoothly or not? | परीक्षा काळात तरी एस.टी. सुरळीत हाेणार की नाही?

परीक्षा काळात तरी एस.टी. सुरळीत हाेणार की नाही?

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दहावी, बारावीच्या परीक्षेला मार्च महिन्यापासून सुरुवात हाेणार आहे. परीक्षेच्या कालावधीत तरी परीक्षा केंद्रापर्यंत जाण्यासाठी एस.टी. सेवा उपलब्ध हाेईल की नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. 
 परिसरातील चार ते पाच शाळांसाठी एक परीक्षा केंद्र राहणार असल्याने ९ ते १० कि.मी. अंतर गाठून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जावे लागणार आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. परीक्षेच्या कालावधीत तरी बससेवा सुरू हाेणार काय, असा प्रश्न विद्यार्थी व पालकांकडून उपस्थित केला जात आहे. बससेवा सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने परीक्षा केंद्र गाठावे लागणार आहे. 

बारावीची परीक्षा ४ मार्चपासून 
बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चपासून सुरुवात हाेऊन ३० मार्चपर्यंत चालणार आहे. सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत व दुपारी ३ ते ६.३० वाजेपर्यंत पेपर राहणार आहेत. १३ हजार १६८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 

दहावीची परीक्षा १५ मार्चपासून 
दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. एकूण १४ हजार ७२५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सकाळी १०.३० ते २ वाजेपर्यंत परीक्षा चालेल. सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. 

अहेरी आगारात २६ फेऱ्या सुरू
अहेरी आगारात ११ कंत्राटी चालक, ४ जुने चालक व ३ वाहक कामावर रूजू आहेत. त्यांच्या भरवशावर २६ फेऱ्या सुरू आहेत.

काही कर्मचारी रुजू हाेण्यास सुरुवात
सतत चार महिन्यांपासून कामबंद आंदाेलन सुरू आहे. वेतन बंद असल्याने एस.टी. कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे काही कर्मचारी संपातून माघार घेत रुजू हाेत आहेत. गडचिराेली आगारात सद्य:स्थितीत २० कंत्राटी चालक, ६ जुने चालक व १५ वाहक काम करीत आहेत. ७० बसफेऱ्या सुरू आहेत. 

Web Title: During the examination, however, S.T. Will it go smoothly or not?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.