देसाईगंजात एसटी बसमुळे हाेते वाहतुकीची काेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:24+5:302021-07-23T04:22:24+5:30
देसाईगंज शहरात दिवसेंदिवस वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच जवळपास सर्वच जिल्ह्यांच्या सीमा लागून असल्याने वाहनांच्या वर्दळीची संख्या ...

देसाईगंजात एसटी बसमुळे हाेते वाहतुकीची काेंडी
देसाईगंज शहरात दिवसेंदिवस वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच जवळपास सर्वच जिल्ह्यांच्या सीमा लागून असल्याने वाहनांच्या वर्दळीची संख्या मोठीच आहे. चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या शहरात एसटीचे स्वतंत्र बसस्थानक नाही. बसस्थानकासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागील बाजूकडील जागा प्रस्तावित झाली आहे. त्या जागेचे बसस्थानकासाठी भूमिपूजनाचे सोपस्कार ही पार पाडण्यात आले. आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना याबाबी संबंधात अवगत करुन देऊन सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु आजतागायत या बसस्थानकाचे काम प्रत्यक्षात सुरु झाले नाही.
देसाईगंज येथे गडचिरोली, ब्रम्हपुरी आगारांच्या बसेस येतात व थांबतात. रस्त्यावर उभे करण्यात येणाऱ्या बसेस व्यवस्थित रस्त्याच्या कडेला लावत नाही. यामुळे रस्त्याचा काही भाग बसने व्यापला जाते. एकाच वेळेला रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसेस लागल्या तर वाहतुकीसाठी रस्ताच उरत नाही. त्यामुळे याठिकाणी नेहमीच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. तसेच या बसेस रस्त्यावरच लागून असल्या कारणाने बाजार परिसरातून येणाऱ्या वाहनधारकांना समोरचे वाहने न दिसल्यामुळे आजवर अनेक लहान मोठे अपघातही झालेले आहे.
210721\1107img_20210721_174644.jpg
देसाईगंज येथील याच परिसरात महामार्गावर उभ्या असतात बसेस....