जिमलगट्टाला वादळी पावसाचा तडाखा
By Admin | Updated: August 31, 2016 01:48 IST2016-08-31T01:48:50+5:302016-08-31T01:48:50+5:30
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरात मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी पावसासह

जिमलगट्टाला वादळी पावसाचा तडाखा
जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरात मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी पावसासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, विद्युत खांब वाकले, त्यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला.
सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळच्या सुमारास अहेरी, सिरोंचा तालुक्यात दमदार पाऊस झाला. विशेष करून जिमलगट्टा परिसरात वादळासह पाऊस झाला. दमदार पावसाने नदी, नाल्यांना पूर आला. वादळामुळे जिमलगट्टा येथील मरयालू बोरेम यांच्या घरावर झाड कोसळले. त्यामुळे घरावरील कवेलू फुटले. घरातील साहित्याचेही नुकसान झाले. देचलीपेठाकडे जाणाऱ्या विद्युत लाईनवर झाड कोसळल्याने विद्युत ताराही तुटल्या. त्यामुळे देचलीपेठा परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला व मंगळवारी रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होता. रसपल्ली नालाही तुडूंब भरून वाहत होता.