पावसामुळे भाकरोंडी-भान्सी मार्ग खचला
By Admin | Updated: October 9, 2014 23:01 IST2014-10-09T23:01:50+5:302014-10-09T23:01:50+5:30
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे खोलगट भागातील पाण्याचा प्रवाह वाढून आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा परिसरातील भाकरोंडी-भान्सी मार्ग काही प्रमाणात वाहून गेला.

पावसामुळे भाकरोंडी-भान्सी मार्ग खचला
जोगीसाखरा : सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे खोलगट भागातील पाण्याचा प्रवाह वाढून आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा परिसरातील भाकरोंडी-भान्सी मार्ग काही प्रमाणात वाहून गेला. संततधार पावसामुळे या मार्गावर भलामोठा खड्डा निर्माण झाला आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे आरमोरी तालुक्यातील अनेक डांबरीकरण व कच्च्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक मार्गाची दूर्दशा झाली आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. संततधार पावसामुळे भाकरोंडी ते भान्सी दरम्यानच्या मार्गावर देवखडकी गावाजवळ खड्डा पडला आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या संरक्षण भिंतीलाही मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर रात्रीच्या वेळेस अपघात होण्याची दाट शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने भाकरोंडी-भान्सी मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी भाकरोंडी व भान्सी परिसरातील नागरिकांनी केली आहे. दूरवस्था झालेल्या भाकरोंडी-भान्सी मार्गासह अन्य मार्गाची दूरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोगीसाखरा परिसरातील नागरिकांनी अनेकदा प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे केली. अनेकदा निवेदनही दिले. मात्र गावकऱ्यांच्या मागणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. (वार्ताहर)