सीझरीन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर नसल्याने पुन्हा एक नवजात शिशु दगावले

By Admin | Updated: December 29, 2014 23:41 IST2014-12-29T23:41:44+5:302014-12-29T23:41:44+5:30

निगरगट्ट झालेल्या आरोग्य यंत्रणेने सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात तीन नवजात शिशूंचा बळी घेतला आहे. सीमावर्ती सिरोंचा तालुक्यात या घटना घडल्या आहे.

Due to no cesarean surgery, a newborn infant burst again | सीझरीन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर नसल्याने पुन्हा एक नवजात शिशु दगावले

सीझरीन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर नसल्याने पुन्हा एक नवजात शिशु दगावले

गडचिरोली : निगरगट्ट झालेल्या आरोग्य यंत्रणेने सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात तीन नवजात शिशूंचा बळी घेतला आहे. सीमावर्ती सिरोंचा तालुक्यात या घटना घडल्या आहे. मात्र आरोग्य विभागाने गंभिरतेने या घटनेची दखल घेण्याऐवजी सावरासावर करण्याची भूमिका चालविली असल्याने आरोग्य यंत्रणेविषयी सर्वसामान्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
छत्तीसगड-तेलंगणा सीमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात आरोग्याच्या फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. बोटावर मोजण्याएवढेच आरोग्य केंद्र व सिरोंचा येथे ग्रामीण रूग्णालय आहे. मात्र या रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे. त्यामुळे बाळंतपणाच्या अनेक केसेस ग्रामीण भागातून सिरोंचा येथे पाठविल्या जातात. मात्र सिरोंचा रूग्णालयात सीझरीन शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर नाहीत. येथील डॉक्टर एका खासगी दवाखान्याने ज्यादा पगारावर पळवून नेले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अशाच स्थितीत २७ डिसेंबरला अंकिसा गावाजवळील जंगलपल्ली येथील समक्का महेश पेरकरी (२७) या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर अंकिसा रूग्णालयात आणण्यात आले. तेथील डॉ. सादमवार यांनी या महिलेची नार्मल डिलेव्हरी करण्याचा कसोशीचा प्रयत्न केला. मात्र सीझरीनशिवाय महिलेच्या पोटातून नवजात शिशू काढता येणे शक्य नव्हते. सिरोंचा रूग्णालयात सीझरीन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर नाही. ही बाब लक्षात घेऊन तेलंगणा राज्यातील दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. तब्बल पाच ते सातासाचा गोदावरी नदीतून बोटीवर प्रवास करीत शिशूचा एक हात बाहेर निघालेला अवस्थेत असतानाही महिलेला करीमनगर जिल्ह्याच्या गोदावरीखनी येथील रूग्णालयात पोहोचविण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया करून महिलेचे शिशू काढण्यात आले. मात्र ते मृतावस्थेत होते. त्याचे वजन साडेतीन किलो होते. अंकिसा, सिरोंचा रूग्णालयात महिलेला सीझरीन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर मिळाले असते तर सदर महिलेचे अपत्य वाचले असते. मात्र सिरोंचा तालुक्यासाठीची आरोग्य यंत्रणा विभागाने सजग केली नाही. त्यामुळे आणखी एका महिलेला आपले नवजात शिशू गमवावे लागले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Due to no cesarean surgery, a newborn infant burst again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.