तलाव फुटल्याने धान पऱ्ह्यांचे नुकसान

By Admin | Updated: July 13, 2016 02:09 IST2016-07-13T02:09:53+5:302016-07-13T02:09:53+5:30

संततधार पावसामुळे तालुक्यातील भेंडाळा येथील सगनापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तलावाची पाळ...

Due to the loss of paddy, the loss of paddy | तलाव फुटल्याने धान पऱ्ह्यांचे नुकसान

तलाव फुटल्याने धान पऱ्ह्यांचे नुकसान

भेंडाळा येथील घटना : शेतकऱ्यांनी तलावाची पाळ बुजविली
चामोर्शी : संततधार पावसामुळे तालुक्यातील भेंडाळा येथील सगनापूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या तलावाची पाळ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास फुटल्याने तलावातील पाणी शेतशिवारात शिरले. दरम्यान शेतात टाकण्यात आलेले पऱ्हे वाहून गेले. तसेच काही शेतातील पाळे फुटून शेत सपाट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
मंगळवारी सकाळी तलावाची पाळ फुटल्याची माहिती मिळताच तलाव सभोवताल शेती असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ५०० रिकाम्या चुंगड्यांमध्ये रेती व माती भरून सकाळी १० वाजताच्या सुमारास सदर तलावाची फुटलेली पाळ बुजविण्यात आली. तलावाची पाळ फुटून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी पं. स. सदस्य प्रमोद भगत यांनी केली. दरम्यान त्यांच्यासह तलाठी कुकुडकर, पोलीस पाटील म्हशाखेत्री, बारसागडे, जुवारे, कवडू सातपुते यांनी तलावाची पाहणी केली. (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Due to the loss of paddy, the loss of paddy