नूतनीकरणाअभावी ६०० माेलकरणी राहणार मदतीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:36 AM2021-04-17T04:36:22+5:302021-04-17T04:36:22+5:30

जिल्ह्यात ६२० माेलकरणींनी २०१४ मध्ये नाेंदणी केली हाेती. नाेंदणीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. मात्र त्यापैकी बहुतांश माेलकरणींनी नूतनीकरण केले ...

Due to lack of renewal, 600 workers will be deprived of assistance | नूतनीकरणाअभावी ६०० माेलकरणी राहणार मदतीपासून वंचित

नूतनीकरणाअभावी ६०० माेलकरणी राहणार मदतीपासून वंचित

Next

जिल्ह्यात ६२० माेलकरणींनी २०१४ मध्ये नाेंदणी केली हाेती. नाेंदणीचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. मात्र त्यापैकी बहुतांश माेलकरणींनी नूतनीकरण केले नाही. त्यामुळे त्या आता शासनाच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. केवळ ५ माेलकरणींनी नूतनीकरण केले असल्याने त्यांनाच लाभ मिळणार आहे.

बाॅक्स

हजारावर माेलकरणींची नाेंदणीच नाही

जिल्हाभरात १ हजार पेक्षा अधिक माेलकरणी आहेत. मात्र त्यांची नाेंदणी करण्यात आली नाही. आजपर्यंत नाेंदणी करूनही लाभ मिळत नसल्याने त्यांनी नाेंदणी केली नाही. तर ज्यांनी नाेंदणी केली त्यांनी नूतनीकरण केले नाही. त्यामुळे आता शासनाकडून मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहावे लागते.

तहसीलवर नाेंदणीची साेय आवश्यक

माेलकरणीला नाेंदणी करायची असेल तर गडचिराेली येथील जिल्हा कामगार कार्यालयात येऊन नाेंदणी करावी लागते. २०० किमी अंतरावर असलेल्या सिराेंचातील महिलेला जिल्हा स्थळ गाठून नाेंदणी करणे व दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे शक्य हाेत नाही. परिणामी अनेक महिला नाेंदणीच करीत नाही.

नाेंदणीसाठी बँक पासबुक, आधार कार्ड, पत्ता, घरमालकाचे हमीपत्र एवढीच कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे प्रत्येक माेलकरणीकडे राहतात.

काेट

शासनामार्फत काेणत्या याेजना राबविल्या जातात, याची आपल्याला माहिती नाही. नाेंदणी कुठे करावी लागते हे सुद्धा माहीत नाही. आपली नाेंदणी नसल्याने लाभ मिळणार नाही. प्रशासनाने याेजनांची माहिती आम्हाला देण्याची गरज आहे.

मालूबाई शेडमाके

घर मालकांनी घरी येण्यास प्रतिबंध घातल्याने महिनाभरापासून मजुरी बंद आहे. काेराेनाच्या कालावधीत दुसरी मजुरी शाेधणे सुद्धा कठीण आहे. घरीच राहावे लागते. शासनाने काेणती याेजना सुरू केली आहे. त्याची आपल्याला काहीच कल्पना नाही. पहिल्या लाटेच्या वेळीही आमच्या कुटुंबाचे हाल झाले हाेते.

शेवंता लाकडे

जिल्ह्यातील अंदाजित माेलकरणींची संख्या १२००

नाेंदणीकृत माेलकरणी ४

Web Title: Due to lack of renewal, 600 workers will be deprived of assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.