पावसाअभावी शेतजमिनी भेगा पडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:40+5:302021-09-05T04:41:40+5:30
यावर्षी जून, जुलै महिन्यात झालेल्या अल्प पावसामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था करून धान पिकासोबतच विविध पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड ...

पावसाअभावी शेतजमिनी भेगा पडण्याच्या मार्गावर
यावर्षी जून, जुलै महिन्यात झालेल्या अल्प पावसामुळे शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था करून धान पिकासोबतच विविध पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. दरम्यान पावसाने दडी मारल्यामुळे येथील काही प्रमाणातील शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर रोवणीचे काम आटोपले. मात्र ज्यांच्याकडे सिंचन सुविधाच उपलब्ध नाही अथवा जवळपास पाण्याची कुठलीही सोय उपलब्ध नसल्याने रोपणी केलेले पीक जुलै व ऑगस्ट महिनाही संपून गेला असताना पावसाचा पत्ताच नाही. शेतातील उभे पीक कशाच्या भरोशावर वाचवायचे याच विवंचनेत सापडले आहेत.
दरम्यान देसाईगंज तालुक्यात इटिया डोह सिंचन प्रकल्प लाभ क्षेत्रातील खरीप हंगामात इटिया डोहाचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले असले तरी बहुसंख्य शेतकरी वर पाण्यावर अवलंबून असल्याने एकूणच शेतकरी दुष्काळाच्या सावटात सापडल्याचे दिसून येत आहे.
.