महत्त्वाच्या कागदपत्रांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:37 IST2017-08-26T23:36:45+5:302017-08-26T23:37:09+5:30
जुनी कागदपत्रे व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महत्त्वाच्या कागदपत्रांची दुरवस्था होत आहे.

महत्त्वाच्या कागदपत्रांची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : जुनी कागदपत्रे व रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महत्त्वाच्या कागदपत्रांची दुरवस्था होत आहे.
जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र व इतर दाखले काढण्याकरीता आजोबा, पंजोबा, यांच्या नावाचे नोंद असलेले कोतवाल पंजी, अधिकार अभिलेख पंजी, पी-१ ही कागदपत्रे महत्वाचा पुरावा म्हणून मागण्यात येते. कोतवाल पंजी पंचायत समीतीकडून मिळते. तर अधिकार अभिलेख पंजी तहसील कार्यालयातून मिळते. सदर महत्वाचे रेकॉर्ड सुरक्षीत ठेवण्यास संबधीत विभागाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना हे महत्त्वाचे कागदपत्रे मिळणे अवघड झाले आहे. पूर्वी रजिस्टरवरील संबधीताचे नाव असल्यास त्यांना त्याचा उतारा त्या दाखल्यावर उतरवून संबधीत अधिकाºयांच्या स्वाक्षरीने दिल्या जायचे. त्यामुळे जुना रेकॉर्ड टिकून राहायचा. पंरतू आता मुळ रजिस्टरची झेरॉक्स प्रत मागविले जातात. या रेकॉर्ड खुपच जुने असल्याने रजिस्टर मधील कागद कुजलेले आहे. झेरॉक्स काढताना अनेक कागद पाडले जातात. अशा जुन्या कागदपत्रांची प्रशासनाने जपवणूक करावी.