दुकानांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी
By Admin | Updated: June 12, 2016 01:15 IST2016-06-12T01:15:42+5:302016-06-12T01:15:42+5:30
शहरातील जुना बसस्थानक चौक ते नगर पंचायतीकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत अतिक्रमीत दुकाने व रस्त्याच्या बाजुला उभी ठेवलेली वाहने यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून

दुकानांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी
कुरखेडा गावाची व्यथा : व्यावसायिकांच्या वाढत्या अतिक्रमणाकडे नगर पंचायतीचे होत आहे दुर्लक्ष
कुरखेडा : शहरातील जुना बसस्थानक चौक ते नगर पंचायतीकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत अतिक्रमीत दुकाने व रस्त्याच्या बाजुला उभी ठेवलेली वाहने यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
देसाईगंज-कुरखेडा-कोरची या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजुला बाजारपेठ वसली आहे. सदर मार्ग कुरखेडा शहराच्या अगदी मध्यभागातून जाते. जुना बसस्थानक ते ए टू झेड मोबाईल गॅलरीच्या दुकानापर्यंत मार्केटलाईन आहे. दुकानदार दुकानातील सामान रस्त्याच्या बाजुला आणून मांडतात. त्यामुळे वाहनांना उभे ठेवण्यासाठी जागा राहत नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावरच उभी ठेवली जातात. परिणामी एसटी, ट्रक यासारखी मोठी वाहने आल्यास वाहतुकीचा अडथळा निर्माण होते. मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून मालवाहू वाहने सुध्दा दिवसभर ये-जा करतात. परिणामी वाहतुकीची कोंडी सुध्दा दिवसभर चालते. शनिवारी दुपारच्या सुमारास अशीच वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. प्रभारी पोलीस अधिकारी सुधीर कटारे यांनी घटनास्थळ गाठून खासगी प्रवासी वाहने व इतर वाहनचालकांना तंबी देऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. (तालुका प्रतिनिधी)