दुष्काळाने जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित
By Admin | Updated: January 11, 2016 01:29 IST2016-01-11T01:29:02+5:302016-01-11T01:29:02+5:30
यावर्षीच्या दुष्काळाने गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामातील १ लाख ८१ हजार ५१३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

दुष्काळाने जिल्ह्यातील पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित
महसूल विभागाची माहिती : शासनाकडून मिळणार लाभ
गडचिरोली : यावर्षीच्या दुष्काळाने गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामातील १ लाख ८१ हजार ५१३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याचा फटका १ लाख २२ हजार ५३० शेतकऱ्यांना बसला आहे. ५० टक्के पेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. याचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
खरीप हंगामाची पेरणी होणारे गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १ हजार ५३१ गावे आहेत. या गावांपैकी १ हजार ३९८ गावांची आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी आहे. या गावांमध्ये शासनातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत. महसूल व कृषी विभागाने केलेल्या पाहणीनुसार गडचिरोली तालुक्यातील १८ हजार ४१७ शेतकऱ्यांचे २४ हजार १३९ हेक्टर क्षेत्र बाधित झाली आहे. धानोरा तालुक्यातील ११ हजार ७४६ शेतकऱ्यांचे २३ हजार ४५ हेक्टर, चामोर्शी तालुक्यातील २७ हजार २९ शेतकऱ्यांचे ३७ हजार ६३८ हेक्टर, मुलचेरा तालुक्यातील ४ हजार १९ शेतकऱ्यांचे ६ हजार १८२, देसाईगंज तालुक्यातील ५ हजार ६०८ शेतकऱ्यांचे ६ हजार ४० हेक्टर, आरमोरी तालुक्यातील १६ हजार ४२३ शेतकऱ्यांची १८ हजार ८३ हेक्टर, कुरखेडा तालुक्यातील १२ हजार ८६१ शेतकऱ्यांचे १६ हजार २३०, कोरची तालुक्यातील ६ हजार ५६१ शेतकऱ्यांचे १२ हजार ४५९, अहेरी तालुक्यातील ७ हजार १४१ शेतकऱ्यांचे ११ हजार ४७५, भामरागड तालुक्यातील २ हजार ९०३ शेतकऱ्यांचे ८ हजार ४२४, एटापल्ली तालुक्यातील ७ हजार ८५५ शेतकऱ्यांचे १५ हजार ४८९, सिरोंचा तालुक्यातील १ हजार ९६७ शेतकऱ्यांचे २ हजार ३०६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
५० टक्के पेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांची यादी प्रशासनाने जाहीर केली आहे. दुष्काळासाठी केंद्राने निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या निधीचे आता कधी वितरण केले जाते. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर हेक्टरी किती मदत दिली जाते, याचीही शेतकरीवर्ग आवासून वाट बघत आहे. (नगर प्रतिनिधी)