जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांस धोका

By Admin | Updated: October 10, 2015 01:31 IST2015-10-10T01:31:41+5:302015-10-10T01:31:41+5:30

जिमलगट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुनी इमारत जीर्णावस्थेत आली आहे.

Due to the dilapidated buildings, students are at risk | जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांस धोका

जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांस धोका

इमारत उद्ध्वस्त करा : जिमलगट्टा येथील पालकांची मागणी
जिमलगट्टा : जिमलगट्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुनी इमारत जीर्णावस्थेत आली आहे. मात्र या इमारतीलगतच शाळेचे पटांगण असल्याने येथे विद्यार्थी नेहमी खेळत असतात. त्यामुळे सदर जीर्ण इमारत कधीही कोसळून विद्यार्थ्यांच्या जिवास धोका असल्याने इमारत उद्ध्वस्त करून त्याजागी नवीन इमारत बांधावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
जिमलगट्टा येथे कवेलूची एक जुनी इमारत आहे. त्यापैकी एका वर्गखोलीत पावसाचे पाणी गळते, तर दुसऱ्या खोलीत शालेय पोषण आहार शिजविला जातो. शाळेच्या आवारात मध्यभागी असलेली इमारत जीर्ण झाली असून ती केव्हाही कोसळू शकते. यामुळे तेथे नवीन इमारत बांधण्याची मागणी होत आहे.

Web Title: Due to the dilapidated buildings, students are at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.