प्रसूतिगृहाचे बांधकाम कोसळण्याच्या अवस्थेत

By Admin | Updated: August 27, 2015 01:46 IST2015-08-27T01:46:06+5:302015-08-27T01:46:06+5:30

अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात चार खाटांची इमारत बांधण्यात आली आहे व २०१२-१३ मध्ये प्रसूतिगृहाचे बांधकामही करण्यात आले.

Due to collapse of construction of the maternity house | प्रसूतिगृहाचे बांधकाम कोसळण्याच्या अवस्थेत

प्रसूतिगृहाचे बांधकाम कोसळण्याच्या अवस्थेत

कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात चार खाटांची इमारत बांधण्यात आली आहे व २०१२-१३ मध्ये प्रसूतिगृहाचे बांधकामही करण्यात आले. मात्र अत्यंत कमी कालावधीत या इमारतीची दुरवस्था झाली असून या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी कमलापूर तालुका युवा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात चार खाटांची इमारत व प्रसूतिगृह सन २०१२-१३ मध्ये बांधण्यात आले. चार खाटांच्या इमारतीच्या टाईल्स पडायला लागल्या आहे. काही टाईल्स फुटल्याही आहेत. जागोजागी खड्डे पडले असून व्हेेंटीलेटर लावण्यात आलेले नाही. पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नाही. प्रसूतिगृहाची टाईल्स पडत आहे. मागचा दरवाजाही नाही. शौचालय आहे पण टाकी नाही, त्यामुळे पाणी वापरता येत नाही. निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले असून संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी समितीने केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Due to collapse of construction of the maternity house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.