शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

डीटीएड् पदवीधारक लागले शेतीकामाला

By admin | Updated: July 19, 2014 01:12 IST

शिक्षक बनण्याचा ध्यास ठेवून हजारो विद्यार्थ्यांनी

शिक्षकांची भरती प्रक्रियाही बंदच : अनेक अध्यापक विद्यालयांना लागले कुलूपपुरूषोत्तम भागडकर  देसाईगंजशिक्षक बनण्याचा ध्यास ठेवून हजारो विद्यार्थ्यांनी डीटीएडचे शिक्षण घेतले. मात्र सीईटीच्या गुणवत्ता यादीत निभाव न लागल्याने बेरोजगार झालेले डीटीएडधारक शेतीच्या कामाला लागले आहेत. डीटीएडधारकांना ‘मास्तर’ची नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा डीटीएडकडे कल अत्यंत कमी झाला असून विद्यार्थ्यांअभावी अनेक अध्यापक विद्यालय बंद झाले आहेत. परिणामी सुरू असलेलेही अध्यापक विद्यालय बंद होण्याच्या मार्गावर आहेत.पूर्वी डीएड म्हणजे, शिक्षकाची हमखास नोकरी म्हणून डीटीएडकडे पाहिले जात होते. १९७० ते १९८५ च्या काळात अध्यापनशास्त्राची पदविका घेतल्यानंतर हमखास शिक्षकाची नोकरी मिळत होती. पुढे १९९० पासून राज्य शासनाने शेकडोंच्या संख्येत खासगी अध्यापक विद्यालयांना विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिली. अध्यापक विद्यालयाची निवड करताना ३० टक्के उमेदवार व्यवस्थापन कोट्यातून निवडण्याचे अधिकार अध्यापक विद्यालयाच्या व्यवस्थापनाला देण्यात आले होते. यावेळी नोकरीच्या हव्यासापोटी कमी टक्केवारी असलेल्या व केंद्रीय फेरीत निवड न झालेल्या उमेदवारांना व्यवस्थापन कोट्यातून संधी मिळत होती. उमेदवार दोन ते अडीच लाखापर्यंत पैसे भरून डीटीएड पदविका पूर्ण करीत होते. यानंतर राज्य शासनाने अध्यापक विद्यालयांना मान्यता देणे सुरूच ठेवल्याने कालांतराने डीटीएड पदविका घेतलेल्या बेकारांची फौज निर्माण झाली. राज्य शासनाने राज्यात शिक्षक भरतीसाठी २००९-२०१० मध्ये सीईटी परीक्षा घेतली होती. त्यानंतर मागील वर्षात टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो डीटीएडधारकांनी परीक्षेसाठी आवेदन दाखल करून परीक्षा दिली. परंतु या परीक्षेचा निकाल अत्यंत कमी लागला. टक्केवारीच्या अर्हतेमध्ये जिल्ह्यातील मोजकेच डीटीएडधारक टीईटीत उत्तीर्ण झाले. संपूर्ण विदर्भाचा निकाल ५ टक्केच्या आतच होता. त्यामुळे डीटीएडधारकांच्या अडचणी वाढल्या असून बेरोजगारांची फौज निर्माण होत आहे. परिणामी बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता डीटीएडला पाठ दाखवित आहेत. आजच्या घडीला राज्यात अनेक शिक्षकांची पदे रिक्त असून शिक्षक पदभरतीची प्रक्रिया बंद आहे. शाळा पटपडताळणीमध्ये राज्यभर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. तीच स्थिती जि.प.ची असून जिकडे तिकडे समायोजन प्रक्रिया होत आहे. त्यामुळे डीटीएडधारकांचे मास्तर होण्याचे स्वप्न केवळ दिवास्वप्नच राहणार आहे, हे निश्चित. त्यामुळे आजच्या घडीला डीटीएड झालेला विद्यार्थी शेतीकामाच्या हंगामावर रोजंदारीने मिळेल ते काम करीत आहे. अनेक डीटीएडधारक बाहेर जिल्ह्यात कामाच्या शोधात जात आहे. तर बाहेर राज्यातही रोजगारासाठी जाणाऱ्यांची संख्या ही कमी नाही. परिणामी अनेक अध्यापक विद्यालय विद्यार्थी मिळत नसल्याने बंद झालीत.शासनाने वेगळी सीईटी परीक्षा घेण्यापेक्षा पात्रता विषय म्हणून सीईटीला स्वतंत्र डीटीएडमध्ये विषय म्हणून ठेवला असता तर पुन्हा नव्याने ही पात्रता परीक्षा द्यावी लागली नसती. शिक्षक बनण्यासाठी आपल्याला एवढी धडपड करावी लागली नसती.- अब्दुल शेख, डीटीएडधारक