पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

By Admin | Updated: August 28, 2015 00:13 IST2015-08-28T00:13:09+5:302015-08-28T00:13:09+5:30

बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाचे आगमन झाल्याने वातावरणातील उकाडा कमी झाला.

Drought relief to farmers due to rain | पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा

उकाडा झाला कमी : गडचिरोलीत काँग्रेसचा मेळावा रद्द; गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक पाऊस
गडचिरोली : बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्रीपासून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाचे आगमन झाल्याने वातावरणातील उकाडा कमी झाला. दिवसभर अधूमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने याचा परिणाम जनजीवनावरही झाला. गुरूवारी गडचिरोली येथे गुरूवारी होणारा युवक काँग्रेसचे मेळावा पावसामुळे मैदानात चिखल तयार झाल्यामुळे रद्द करण्यात आला. जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातही सकाळी पाऊस झाल्याने जागोजागी पाणी जमा झाले होते.
तब्बल २० दिवसानंतर पावसाचे पुन्हा आगमन झाले. अनेक शेतकऱ्यांचे धानपीक करपायला लागले होते. मात्र बुधवारी झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र अजूनही रोवणी सुरू होण्यासाठी मुसळधार पावसाची नितांत आवश्यकता आहे. बरेचसे जलसाठे अजूनही कोरडे असल्याने शेतकरीवर्ग मुसळधार पावसाची अपेक्षा करीत आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटीनंतर पावसाचे प्रमाण कमी होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. पाऊस कमी झाल्यास धानपीक भविष्यातही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनही जिल्ह्यात ४० टक्के भागात रोवणीच्या कामांना सुरुवात झालेली नाही. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Drought relief to farmers due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.