ऐतिहासिक गोरजाई मंदिराची दुरवस्था

By Admin | Updated: February 8, 2015 23:45 IST2015-02-08T23:45:38+5:302015-02-08T23:45:38+5:30

येथील नागवंशीय माना जमातीच्या ऐतिहासिक गोरजाई मंदिराच्या देवालयापर्यंत जाण्यास रस्ता नाही. या मंदिराची दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

The drought of the historic Gorzej Temple | ऐतिहासिक गोरजाई मंदिराची दुरवस्था

ऐतिहासिक गोरजाई मंदिराची दुरवस्था

वैरागड : येथील नागवंशीय माना जमातीच्या ऐतिहासिक गोरजाई मंदिराच्या देवालयापर्यंत जाण्यास रस्ता नाही. या मंदिराची दुरवस्था झाली आहे. मात्र याकडे स्थानिक प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
वैरागड येथे पुरातन किल्ला, भंडारेश्वर मंदिर, गोरजाई, आदिशक्ती व मुस्लिम समाज बांधवांचा इदगाह तसेच हेमाडपंथी मंदिर व गावाच्या दक्षिणेला खोब्रागडी नदीच्या काठावरील टेकडीवर भंडारेश्वर मंदिर आहे. भंडारेश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी सीमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला असून पूरातत्व विभागाकडून या किल्ल्याच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. मात्र गोरजाई मंदिराच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
१५ फेब्रुवारीला गोरजाई मंदिरात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून दरवर्षी गोरजाई मंदिरात यात्रा भरत आहे. तेव्हापासून या मंदिराची किरकोळ डागडुजी करण्यात आली. मात्र गोरजाई मंदिराचे स्वरूप बदलविण्यासाठी स्थानिक प्रशासन व पुरातत्व विभागाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाही. गावाच्या एका बाजुला गोरजाई डोहाच्या काठावर सभोवताल शेताचा वेढा असलेल्या ठिकाणी गोरजाई मंदिर आहे. ज्या प्रमाणे येथील ऐतिहासिक किल्ल्याला १८ बुरूज आहेत. त्याप्रमाणे गोरजाई मंदिर १८ रेखीव खांबावर उभे आहे. मंदिराचा उंच कळस व आत मध्ये देवाचा गाभारा व मूर्त्या आहेत. या मंदिरातील मूर्त्या त्या काळातील उत्तम कारागिरीची प्रचिती देतात. (वार्ताहर)

Web Title: The drought of the historic Gorzej Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.