शहरं
Join us  
Trending Stories
1
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
2
Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
3
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
4
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
5
ना भरपाई देणार, ना मालमत्ता मुक्त करणार; आणि युरेनियम...; इराणच्या प्रस्तावावर अमेरिकेच्या पाच कठोर अटी
6
Neet Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट! लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात
7
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
8
Hirkani Tigress: चकवा देणारी ‘हिरकणी’ पुन्हा कॅमेऱ्यात कैद; गळ्यातील जीपीएस कॉलर मात्र गायब
9
संसार वाचवण्याचे 'तोडगे' ठरले अपयशी अन् तिने मृत्यूला कवटाळले; उच्चशिक्षित विवाहितेचा करुण अंत
10
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
11
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
12
"मी घाईत आहे...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मौनीने पापाराझींना टाळलं, पण पुढे काय घडलं पाहा
13
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
14
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
15
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
16
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
17
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
18
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
19
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
20
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

कामात स्थानिक मजुरांना डच्चू

By admin | Updated: May 15, 2015 01:32 IST

वडसा वन परिक्षेत्रांतर्गत शिरपूर उपक्षेत्रातील अरततोंडी येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नवीन रोपवनासाठी खड्डे खोदकाम करण्यात आले.

भीमराव मेश्राम  जोगीसाखरा
वडसा वन परिक्षेत्रांतर्गत शिरपूर उपक्षेत्रातील अरततोंडी येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नवीन रोपवनासाठी खड्डे खोदकाम करण्यात आले. मात्र या कामातून स्थानिक मजुरांना डावलून पिंपळगाव येथील मजुरांकरवी खड्डे खोदकाम करण्यात आले. गावातील मजुरांचा रोजगार हिरावणाऱ्या वनरक्षक एम. के. येडेवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अन्यायग्रस्त मजुरांनी मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अरततोंडी येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती अंतर्गत अरततोंडी बिटामध्ये नव्या रोपवनाचे काम घेण्यात आले. दरम्यान झुडूपांच्या फांद्या कटाईचे काम सरासरी ३० मजुरांनी पाच दिवसांत केले. या मजुरांना २८६.७३ रूपये ऐवजी २८० रूपयांप्रमाणे मजुरी देण्यात आली. ४५ बाय ४५ सेंटीमिटरच्या आकाराच्या एका खड्ड्याचा भाव ११ रूपये ४६ पैसे आहे. मात्र संयुक्त वन व्यवस्थापन समितीने गावातील मजुरांकडून दोन दिवस खड्डे खोदण्याचे काम करून त्यांना प्रति खड्डा नऊ रूपयांप्रमाणे मजुरी वितरित केली. मजुरी परवड नसल्याच्या कारणावरून गावातील मजुरांनी खड्डे खोदण्याचे काम बंद केले. तसेच खड्डे खोदाईच्या कामाच्या दराचा शासकीय कागदपत्रे दाखवा, अशी मागणी वनरक्षक एम. के. येडेवार यांच्याकडे मजुरांनी केली. यावेळी येडेवार यांनी आम्ही देत असलेल्या दरानुसार काम करा अन्यथा दुसऱ्या गावातील मजूर लावून काम करण्यात येईल, अशी तंबी गावातील मजुरांना दिली. त्यानंतर वनरक्षक येडेवार यांनी लगतच्या पिंपळगाव येथील मजूर लावून रोपवनात खड्डे खोदण्याचे काम केले. स्थानिक पातळीवर रोजगार देण्याबाबत शासन निर्देश आहेत. मात्र वनरक्षक येडेवार यांनी मनमर्जीने या शासन निर्णयाचे उल्लंघन केले. असा आरोपही मजुरांनी वनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या प्रकाराची योग्य चौकशी करून संयुक्त वन व्यवस्थापन समिती व वनरक्षक येडेवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मन्साराम कुमोटी, ईश्वर नरोटे, मोतिराम परचाके, दिलीप परचाके, अरूण मडावी, गुरूदेव पाठणकर, कैलाश परचाके, ममता तुलावी, मीना मडावी आदी मजुरांनी केली आहे.