ट्रॅक्टरच्या अपघातात चालक जागीच ठार
By Admin | Updated: June 16, 2017 00:47 IST2017-06-16T00:47:16+5:302017-06-16T00:47:16+5:30
आलापल्ली-भामरागड मार्गावर पेमिरलीपासून तीन किमी अंतरावर ट्रॅक्टरला अपघात झाल्याने चालक जागीच ठार

ट्रॅक्टरच्या अपघातात चालक जागीच ठार
पेरमिलीजवळची घटना : खोल खड्ड्यात जाऊन वाहन उलटले
लोकमत न्यूज नेटवर्क
पेरमिली : आलापल्ली-भामरागड मार्गावर पेमिरलीपासून तीन किमी अंतरावर ट्रॅक्टरला अपघात झाल्याने चालक जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
शैलेश आत्राम रा. येरमनार असे मृतकाचे नाव आहे. आलापल्ली येथे ट्रॅक्टरचे टायर बदलविण्यासाठी शैलेश आत्राम हा ट्रॅक्टर घेऊन जात होता. दरम्यान पेरमिलीपासून तीन किमी अंतरावर ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला असलेल्या खोल खड्डात जाऊन पलटली. शैलेश ट्रॅक्टरच्या खाली दाबल्या गेला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पेरमिलीचे ठाणेदार अशोक निमगिरे, हवालदार शकील शेख यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.