‘त्या’ अपघातातील चालक गुलदस्त्यात
By Admin | Updated: June 13, 2017 00:45 IST2017-06-13T00:45:53+5:302017-06-13T00:45:53+5:30
सिरोंचाकडून आलापल्लीकडे येणारी भरधाव कार झाडावर आदळल्याने कारमधील दोघे जण ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना....

‘त्या’ अपघातातील चालक गुलदस्त्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सिरोंचाकडून आलापल्लीकडे येणारी भरधाव कार झाडावर आदळल्याने कारमधील दोघे जण ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना छल्लेवाडा वळणानजीक बुधवारी दुपारी घडली. ती अपघातग्रस्त गाडी कोण चालवित होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अपघातग्रस्त गाडी (एमएच ३४, एएम ६१६४) मधील लोक घुग्गुस व बल्लारपूर येथील होते. या अपघातात कारच्या मागील सीटवर बसलेले वेकोलिचे क्रीडा प्रशिक्षक हेमंत उमरे (४०) रा.बल्लारपूर व त्यांचे काका अमरनाथ उमरे (५९) रा.बल्लारपूर जि.चंद्रपूर हे ठार झाले. मात्र गाडीचालक एअरबॅगमुळे बचावला. परंतु तो गंभीर जखमी झाला. जखमी असलेल्या चौघांवर उपचार सुरू आहेत. काही जखमींचे बयाण होणे बाकी असल्यामुळे चालकावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे राजाराम उपपोलीस ठाण्याकडून सांगण्यात आले.