डॉ. आंबेडकर विद्यालयात गणवेश वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:42 IST2021-02-20T05:42:58+5:302021-02-20T05:42:58+5:30
आरमोरी : स्थानिक डॉ. आंबेडकर विद्यालयात इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेचे संस्थाध्यक्ष मदन मेश्राम यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात ...

डॉ. आंबेडकर विद्यालयात गणवेश वितरण
आरमोरी : स्थानिक डॉ. आंबेडकर विद्यालयात इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेचे संस्थाध्यक्ष मदन मेश्राम यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मदन मेश्राम होते. प्रमुख अतिथी मुख्याध्यापक व्ही. जी. शेंडे, पर्यवेक्षक वासनिक उपस्थित होते. यावेळी वर्ग ५ वीतील सर्वच १२९ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून ध्येय निश्चित करावे आणि जिद्द व चिकाटीने वाटचाल केल्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही़, असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष मदन मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन रवींद्र नैताम, तर आभार प्रदर्शन सी. एम, दुरबुळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.