गडचिरोली शहराच्या सौंदर्यीकरणासाठी डीपीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST2021-01-13T05:36:49+5:302021-01-13T05:36:49+5:30

गडचिरोली शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, चंद्रपूर मार्गावरील तलावाचे सुशोभीकरण करून चौपाटी आणि बोटिंगची सुविधा, अंतर्गत रस्त्यांची बांधणी अशा कामांसाठी ...

DPR for beautification of Gadchiroli city | गडचिरोली शहराच्या सौंदर्यीकरणासाठी डीपीआर

गडचिरोली शहराच्या सौंदर्यीकरणासाठी डीपीआर

गडचिरोली शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, चंद्रपूर मार्गावरील तलावाचे सुशोभीकरण करून चौपाटी आणि बोटिंगची सुविधा, अंतर्गत रस्त्यांची बांधणी अशा कामांसाठी जिल्हा निधीसह वैशिष्ट्यपूर्ण कामांच्या निधीतून पैसे उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. या कामांचा डीपीआर तयार होऊन प्राधान्यक्रम निश्चित झाला की टप्प्याटप्प्याने ती कामे केली जातील, असे ना.शिंदे म्हणाले.

जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र अपुरी असल्याने शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागते. त्यासाठी खरेदी केंद्र वाढविता येईल का, याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी आ. किरण पांडव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पर्यटन विकासाला चालना देणार

जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करू शकतील, अशी अनेक ठिकाणं आहेत. पण नक्षलवादाच्या नावाखाली त्यांचा विकास होऊन पर्यटकांना तिकडे आकर्षित करण्याकडे लक्ष देण्यात आले नाही. पण जी स्थळं सेफ झोनमध्ये आहेत त्यांच्याकडे पर्यटकांचा ओढा वाढल्यास रोजगार, स्वयंरोजगाराला चालना मिळेल. त्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष घालणार असल्याचे ना.शिंदे म्हणाले.

फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट तातडीने करा

सध्या ऐरणीवर असलेल्या सरकारी रुग्णालयांमधील अव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. या रुग्णालयातील अपुरी अग्निशमन व्यवस्था आणि इलेक्ट्रिक ऑडिटअभावी असलेली वीजजोडणीतील दुरवस्था ‘लोकमत’ने गेले तीन दिवस सातत्याने मांडली. त्यामुळे पालकमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन अग्निशमन आणि विद्युत पुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने त्याचे ऑडिट करण्याची सूचना प्रशासनाला दिली.

Web Title: DPR for beautification of Gadchiroli city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.