अतिवृष्टीमुळे नऊ घरांची पडझड

By Admin | Updated: September 8, 2014 01:18 IST2014-09-08T01:18:58+5:302014-09-08T01:18:58+5:30

गेल्या दोन-तीन दिवसांपासून चामोर्शी तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रविवारी चामोर्शी

Downfall of nine houses due to excessive rainfall | अतिवृष्टीमुळे नऊ घरांची पडझड

अतिवृष्टीमुळे नऊ घरांची पडझड

चामोर्शी : गेल्या दोन-तीन दिवसांपासून चामोर्शी तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे रविवारी चामोर्शी शहरातील ९ घरांची पडझड होऊन एकूण २८ हजार रूपयाचे नुकसान झाले.
अतिवृष्टीमुळे घर कोसळून घरातील धान्य व इतर साहित्य भिजले आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. माहिती मिळताच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडझड झालेल्या घरांचे सर्व्हेक्षण करून चामोर्शी तहसील कार्यालयाला कार्यवाहीसाठी अहवाल पाठविला असल्याची माहिती तलाठी डी. एस. शेडमाके, सरपंचा मालन बोदलकर, पोलीस पाटील सुरेश कोटांगले, कालिदास मांडवगडे यांनी लोकमतला दिली आहे.
तलाठ्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणानुसार ढिवर मोहल्यातील मनोहर कस्तुरे यांचे दीड हजार रूपये, मारोती शिंदे यांचे साडेतीन हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. बेघर कॉलनीतील लक्ष्मी वामन काटवले यांच्या घराची पडझड होऊन ३ हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. चांभार मोहल्यातील मारोती बोधलकर यांचे ४ हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. ढिवर मोहल्यातील श्रावण भंडारे यांचे दीड हजार रूपयाचे तसेच बेघर कॉलनीतील भागरथा गोविंदा गोलाईत यांचे दीड हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे घराची पडझड होऊन सर्वाधिक वार्ड क्रमांक ६ मधील गजानन बुरांडे यांचे ९ हजार ५०० रूपयाचे नुकसान झाले आहे. डॉ. आंबेडकर वार्डातील नामदेव उंदीरवाडे यांचे ३ हजार ५०० रूपयाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Downfall of nine houses due to excessive rainfall