दांडी मारणारा ग्रामसेवक नकाे; अन्यथा राजीनामे देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:37 IST2021-09-19T04:37:31+5:302021-09-19T04:37:31+5:30
निवेदनानुसार, ग्रामविकास अधिकारी रापेल्लीवार हे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आणि त्यानंतर २७ ऑगस्टच्या मासिक सभेला हजर होते. तेव्हापासून ते ग्रामपंयातमध्ये ...

दांडी मारणारा ग्रामसेवक नकाे; अन्यथा राजीनामे देणार
निवेदनानुसार, ग्रामविकास अधिकारी रापेल्लीवार हे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आणि त्यानंतर २७ ऑगस्टच्या मासिक सभेला हजर होते. तेव्हापासून ते ग्रामपंयातमध्ये सतत गैरहजर राहिले. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या सततच्या गैरहजेरीमुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार थांबले असून अनेक विकासकामे खोळंबली आहेत. ग्रामविकास अधिकाऱ्याच्या दाेषाचा राेष सरपंच, सदस्यांवर गावकरी ओढवून घेत आहेत. जेव्हापासून विद्यमान पदाधिकारी ग्रामपंचायतमध्ये निवडून आले, तेव्हापासून ग्रामविकास अधिकाऱ्यांची हजेरी नसल्याने स्थानिक विकासकामे थांबली असून याला प्रशासकीय व्यवस्था जबाबदार आहे. गाव विकासाची खोळंबलेली कामे पूर्ववत करण्यासाठी ग्राम विकास अधिकारी यांना लवकर रुजू करून घ्यावे, अशी मागणी सरपंच पारिका रणदिवे, उपसरपंच किरण आकरे, ग्रा.पं. सदस्य चंद्रकांत चौके, यश्वानंद इंदुरकर, कृष्णा नेवारे, किरण टेकाम, शीला नागोसे, किरण चौधरी, वैशाली आकरे, सोनू जिटकुंटवार यांनी केली आहे.
बाॅक्स
चार दिवसांचा अल्टिमेटम
पी. जी. रापेल्लीवार हे यापूर्वीही सहा महिन्याच्या वैद्यकीय रजेवर होते. त्यानंतरही कर्तव्यातील अनियमितपणा वारंवार दिसून आला. हे असेच सुरू राहिल्यास गावविकासाचा खेळखंडाेबा हाेईल. त्यामुळे येत्या चार दिवसात रापेल्लीवार यांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे, अन्यथा सरपंच, उपसरपंच व सर्व विद्यमान सदस्य आपल्या पदाचा राजीनामा देऊन ग्रामपंचायतला कुलूप ठोकतील, असा इशारा लेखी निवेदनातून दिला आहे.