मार्कंडेश्वराच्या चरणी पावणेचार लाखांचे दान

By Admin | Updated: February 23, 2015 01:28 IST2015-02-23T01:28:30+5:302015-02-23T01:28:30+5:30

मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेदरम्यान लाखो भक्तांनी मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले.

Donation of Pavanekar lakhs on the charts of Markandeshwar | मार्कंडेश्वराच्या चरणी पावणेचार लाखांचे दान

मार्कंडेश्वराच्या चरणी पावणेचार लाखांचे दान

चामोर्शी : मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त भरलेल्या यात्रेदरम्यान लाखो भक्तांनी मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले. लाखो भाविकांनी दानपेट्याच्या माध्यमातून तसेच पावतीच्या माध्यमातून मार्कंडेश्वराला रोख रूपये दान केले. मार्र्कंडेश्वर मंदिराला दानपेट्याच्या माध्यमातून २ लाख १८ हजार ११० व पावतीच्या माध्यमातून १ लाख ५१ हजार ३०० असे एकूण ३ लाख ६९ हजार ४१० रूपयाचे दान मिळाले.
मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने यात्रेच्या काळात तीन दानपेट्या व एक गुप्तदान हंडी लावण्यात आली होती. या सर्व दानपेट्या २२ फेब्रुवारी रोजी रविवारला रामप्रसाद महाराज मराठा धर्मशाळेच्या सभागृहात उघडण्यात आल्या. दानपेट्या उघडताना मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्युंजय गायकवाड, सहसचिव रामू तिवाडे, कोषाध्यक्ष पां.गो पांडे, रामप्रसाद महाराज धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, किसन गिरडकर, सचिव केशव आंबटवार, रणदिवे महाराज, मोरेश्वर कत्तरे, रामचंद्र मुनरत्तीवार, भैय्याजी चलाख, चामोर्शीचे सहायक फौजदार डी. एम. चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Donation of Pavanekar lakhs on the charts of Markandeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.