काेराेना लस घेण्यापूर्वीच रक्तदान करा, नंतर दाेन महिने थांबावे लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:36 IST2021-03-16T04:36:25+5:302021-03-16T04:36:25+5:30
बाॅक्स रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता ज्यांचे लसीकरण सुरू आहे, त्यामध्ये काही रक्तदातेसुद्धा आहेत. लस घेतल्यानंतर जवळपास दाेन महिने रक्तदान ...

काेराेना लस घेण्यापूर्वीच रक्तदान करा, नंतर दाेन महिने थांबावे लागणार
बाॅक्स
रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता
ज्यांचे लसीकरण सुरू आहे, त्यामध्ये काही रक्तदातेसुद्धा आहेत. लस घेतल्यानंतर जवळपास दाेन महिने रक्तदान करता येत नसल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित रक्तदात्यांनी तसेच रक्तदान करू इच्छिणाऱ्यांनी सर्वप्रथम रक्तदान करावे. त्यानंतरच लसीकरण करावे. गडचिराेली जिल्ह्यातील रुग्णांना माेठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. रक्तदाते शाेधून रक्त गाेळा करावे लागते. अशातच आता रक्तदात्यांना दाेन महिने रक्तदान करता येणार नसल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण हाेण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या डाेसनंतर २८ दिवसांनी रक्तदान
पहिला डाेस घेतल्यानंतर दुसरा डाेस २८ दिवसांनंतर घेतला जाणार आहे. त्यामुळे पहिले २८ दिवस व दुसरे २८ दिवस रक्तदान करणे अशक्य हाेणार आहे.
१२०० नागरिकांना दरदिवशी दिली जाते लस
१८,००० नागरिकांचे आतापर्यंत लसीकरण
२ ब्लड बँक