कुरखेडा तालुक्यात विविध पक्ष व पॅनलचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:44 IST2021-02-20T05:44:13+5:302021-02-20T05:44:13+5:30
गेवर्धा ग्रामपंचायतीवर युवा ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व कुरखेडा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गेवर्धा ग्रामपंचायतीवर ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद यांच्या ...

कुरखेडा तालुक्यात विविध पक्ष व पॅनलचे वर्चस्व
गेवर्धा ग्रामपंचायतीवर युवा ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व
कुरखेडा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गेवर्धा ग्रामपंचायतीवर ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद यांच्या नेतृत्वातील युवा ग्रामविकास पॅनलने सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुकीत वर्चस्व राखले. ९ सदस्यीय गेवर्धा ग्रामपंचायतीवर मतमोजणी आटोपताच दिग्गज राजकीय मंडळींनी आपापला दावा केला होता. कोणत्याही गटाला बहुमत नसल्याने सरपंच व उपसरपंच निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अखेर स्थानिक पातळीवर ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद आणि खेडेगाव येथील माजी सरपंच अनिराम बोगा व माजी उपसरपंच मनोहर लांजेवार एकत्रित येऊन सरपंचपदी सुषमा हर्षवर्धन मडावी तर उपसरपंचपदासाठी ओमप्रकाश श्रीराम बोगा यांना पुढे केले. त्यानंतर प्रक्रियेद्वारे त्यांची निवड करण्यात आली.
मागील पंचवार्षिक आणि यावर्षी निवडणुकीत पॅनल लढवून ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद यांनी उपसरपंचासारखे महत्त्वाचे पद न घेता राजकारणामध्ये आदर्श निर्माण केला असून राजकीय मंडळींना संदेश दिला आहे. त्याचप्रमाणे ग्रा.पं. सदस्य ज्योती कवडो आणि ग्रा.पं. सदस्य कल्पना कांबळे यांचीही भूमिका निर्णायक राहिली. याप्रसंगी माजी सरपंच सय्यद, माजी सरपंच अनिराम बोगा, माजी उपसरपंच मनोहर लांजेवार, मोतीराम गावळे, डॉ. बोरकर, भोला पठाण, निजाम शेख, योगेश गायकवाड, सुनील किलनाके, जितेंद्र पिलारे, राजीराम राऊत, दादाजी मडावी, विजय ढवळे, व्यंकट पुराम, उदाराम गावळे, रैजू कवडो, रामू गावळे, दयाराम कवडो, प्रभाकर गायकवाड, रामदास कुमरे, सुनील बाळबुद्धे, लोमेश बाळबुद्धे, धनू पारधी, बाबा सय्यद, ईसराईल शेख, देवनाथ कवडो, संदीप दर्रो, प्रभाकर कुलमेथे, लियाकत सय्यद, गणपत गावळे, जीवन नैताम, रवींद्र इंदूरकर, वसंता शिडाम उपस्थित हाेते.
जांभुळखेडा ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीचे वर्चस्व
कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गट ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजबत्ती नैताम यांची सरपंचपदी तर उपसरपंच पदावर शिवसेनेचे गणपत बन्सोड यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य मनीषा कवरके, कुंडलिक राऊत, राधा हलामी, कल्पना नंदेश्वर उपस्थित होते. निवडीनंतर माजी उपसरपंच देवानंद लोहबंरे, माजी सरपंच शिवाजी राऊत, अशोक कवरके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नामदेव दादगाये, पोलीस पाटील हिरालाल नंदेश्वर, ऐनिदास कवरके, विकास नंदेश्वर, कलीराम हलामी, धर्मा दरवडे, पंकज गहाणे व गावकऱ्यांनी जल्लोष साजरा केला.
मालदुगी ग्रामपंचायतीवर गाव विकास परिवर्तन पॅनेलचे वर्चस्व
कुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथे १५ फेब्रुवारीला झालेल्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत गाव विकास परिवर्तन पॅनलने वर्चस्व मिळविले. २० वर्षांपासून असलेली यशवंत चौरीकर यांच्या गटाची सत्ता संपुष्टात आली. सरपंचपदी आकांक्षा अरुण नैताम तर उपसरपंचपदी अण्णाजी नैताम यांची निवड झाली. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये लीलाधर रामाजी नैताम, तारा रघुनाथ तुलावी यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांनी निवडीचे श्रेय पं.स. सदस्य संध्या नैताम, राजेश्वर गाथे, कुसन तुलावी, टेमसुजी नैताम, रघुनाथ सहारे, परसराम मेश्राम, सुकराम सहारे, मनोहर कोडाप, भरत प्रधान, छगन भोयर, ईश्वर राऊत, लीलाधर राऊत, विजय औरासे, महादेव नैताम, परसराम तुलावी, दिगांबर कोरोटे, रघुनाथ तुलावी, बाबुराव गाथे, श्रीराम नैताम, रमेश नैताम, महेंद्र सहारे, नंदलाल मानकर, धर्मा चौरीकर, किशोर सहारे, मनोहर घोडाम, पांडुरंग तुलावी, प्रभाकर नैताम, रमेश मुंगमोडे, मुरलीधर चौरीकर, जगन राऊत, तुकाराम तुलावी, सी.आर.नैताम, भजन चौरीकर, न्यूटन विश्वास, यादव तुलावी, वच्छला नैताम यांना दिले.
चिरचाडीच्या सरपंचपदी गावराने तर उपसरपंचपदी किलनाके
कुरखेडा तालुक्यातील चिरचाडी गट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शोभा गावराने तर उपसरपंचपदी तुळशिराम किलनाके यांची बहुमताने निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य निकिता गायकवाड, शेवंता पुराम, बबिता पदा उपस्थित होते. निवड प्रक्रिया पार पडताच सत्ताधारी गटाचे पदाधिकारी प्रकाश मडावी, पंढरी डाेंगरवार, वामन गायकवाड, माणिक करपते, रामचंद्र कोडाप, दलपत कुमरे, नीलेश कापगते, पतिराम मडावी संपत कुमरे बन्सी मानकर, मनोहर गायकवाड, कांशीराम पदा, देवीदास तुलावी, युवराज कवडो, विवेक डोंगरवार यांच्यासह नागरिकांनी जल्लोष साजरा केला.