एटापल्ली तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:37 IST2021-02-16T04:37:33+5:302021-02-16T04:37:33+5:30

जारावंडीमध्ये राकाॅंच्या सपना कोडापे एकमेव सदस्य निवडून आल्या हाेत्या. परंतु त्यांच्या गळ्यातच सरपंचाची माळ पडली. तर काॅग्रेसचे सुधाकर ...

Dominance of NCP in Etapalli taluka | एटापल्ली तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वर्चस्व

एटापल्ली तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे वर्चस्व

जारावंडीमध्ये राकाॅंच्या सपना कोडापे एकमेव सदस्य निवडून आल्या हाेत्या. परंतु त्यांच्या गळ्यातच सरपंचाची माळ पडली. तर काॅग्रेसचे सुधाकर टेकाम उपसरपंच झाले. दिडंवी येथे राकाॅंचे सरपंच तुळशीराम मडावी, तर उपसरपंचपदी कौशीक आवडे विराजमान झाले. या दोन ग्रामपंचायतमध्ये राकाॅं व काॅंग्रेस युती झाल्याची माहिती पंचायत समिती सभापती शालीकराम गेडाम यांनी लोकमतला दिली. घोटसूरमध्ये राकाॅं गटाचे साधू कोरामी सरपंच बनले तर उपसरपंचपदी रामको कोवासी, पुरसलगोंदीत राकाॅंच्या अरुणा सडमेक सरपंच तर उपसरपंचपदी राकेश कवडो, गेदा येथील निवडणूक आविसं करिता प्रतिष्ठेची होती. तब्बल पधंरा वर्षांपासुन ही ग्रामपंचायत आविसंच्या ताब्यात होती. यावेळी बहुमत आविसंकडे होते. परंतु राकाॅं-आविसंचे दोन सदस्य फोडुन त्यांच्याच गळ्यात सरपंच व उपसरपंच पदाची माळ टाकण्यात आली. सरपंचपदी रिना कुळयेटी व उपसरपंचपदी दसरु मट्टामी यांचा विजय झाला. यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम उपस्थित होते. राकाॅंचे सूत्र ऋतुराज हलगेकर यांनी सांभाळले. बुर्गीत सरपंचपदी विलास गावडे तर उपसरपंचपदी पार्वता कांबडे ह्या विजयी झाल्या. कसनसूर येथे आविसं व ग्रामसभेने बाजी मारली. सरपंचपदी कमल ठाकरे तर उपसरपंचपदी छाया हिचामी यांची निवड झाली. तुमरगुंडात भाजप समर्थित गटाच्या सविता गावडे या सरपंचपदी विराजमान झाल्या तर उपसरपंचपदी लालसू कुळयेटी हे निवडून आले.

Web Title: Dominance of NCP in Etapalli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.