पालिकेच्या आरोग्य केंद्राला मिळाला डॉक्टर

By Admin | Updated: August 7, 2015 01:14 IST2015-08-07T01:14:57+5:302015-08-07T01:14:57+5:30

लोकमतने गुरूवारी ‘परिचारिकेच्या भरवशावरच गोकुलनगरातील आरोग्य केंद्र’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून न.प. व जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रशासनाला जागे केले.

Doctors get the health center of the corporation | पालिकेच्या आरोग्य केंद्राला मिळाला डॉक्टर

पालिकेच्या आरोग्य केंद्राला मिळाला डॉक्टर

गडचिरोली : लोकमतने गुरूवारी ‘परिचारिकेच्या भरवशावरच गोकुलनगरातील आरोग्य केंद्र’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून न.प. व जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रशासनाला जागे केले. या वृत्ताची दखल घेत पालिका व जिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाने गुरूवारी गोकुलनगरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. गुरूवारी या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. निशीगंधा उरकुडे या रूजू झाल्या आहेत. तसेच आरोग्य केंद्रात एक सफाई कामगार व पाणी पुरवठ्याचा एक कर्मचारी कामावर लावण्यात आला आहे. डॉक्टर व कर्मचारी मिळाल्याने गोकुलनगरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवेत सुधारणा झाली आहे. नागरिकांनी लोकमतचे आभार मानले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Doctors get the health center of the corporation