डॉक्टरला लाच घेताना अटक
By Admin | Updated: November 26, 2015 01:13 IST2015-11-26T01:13:38+5:302015-11-26T01:13:38+5:30
सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुकदेव माधवराव करेवाड याला नऊ हजार रूपयांची लाच घेताना ....

डॉक्टरला लाच घेताना अटक
नऊ हजार स्वीकारले : निर्वाहभत्त्यासाठी सुकदेव करेवाडने घेतले पैसे
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील टेकडाताला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुकदेव माधवराव करेवाड याला नऊ हजार रूपयांची लाच घेताना पंचासमक्ष २५ नोव्हेंबर रोजी दुपारी २.१० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र टेकडाताला येथील शासकीय निवासस्थानात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
आरोग्य विभागातील निलंबित पर्यवेक्षक पदावरील कर्मचाऱ्याचा आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर २०१५ या तीन महिन्यांच्या निर्वाहनभत्त्याच्या बिलावर स्वाक्षरी करून पंचायत समिती सिरोंचा येथे सादर करण्याच्या कामाकरिता डॉ. सुकदेव माधव करेवाड यांनी १० हजार रूपयांची लाच मागितली होती. मात्र तक्रारकर्त्या कर्मचाऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २४ नोव्हेंबर २०१५ ला तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुकदेव करेवाड याला बुधवारी नऊ हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. त्यांच्या विरूद्ध पोलीस ठाणे बामणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या नेतृत्त्वात विठोबा साखरे, रवींद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, महेश कुकुडकर, गणेश वासेकर, स्वप्नील वडेट्टीवार यांनी पार पाडली. (जिल्हा प्रतिनिधी)