काम बंद आंदोलन करून डॉक्टरांनी केला जि.प. अध्यक्षांचा निषेध
By Admin | Updated: October 27, 2015 01:26 IST2015-10-27T01:26:47+5:302015-10-27T01:26:47+5:30
मुलचेरा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण

काम बंद आंदोलन करून डॉक्टरांनी केला जि.प. अध्यक्षांचा निषेध
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संभाषण करून पदाला न शोभणारी अभद्र चर्चा केल्याच्या निषेधार्थ जि.प. अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांचा राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी कामबंद आंदोलन करून निषेध करण्यात आला. जिल्ह्यातील ५०० वर अधिक डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदींना वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय आकोलकर, सचिव सुनिल मडावी, कार्याध्यक्ष डॉ सचिन हेमके, जिल्हा मॅग्मो आयुर्वेद संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. माधव नलोडे, अस्थायी वैद्यकीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. हिमांशू म्हस्के, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र खरवडे, विनोद सोनकुसरे, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विवेक मून, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश जांभुळे, नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माया सिरसाट आदींनी केले. या आंदोलनात डॉ. नंदकुमार माळाकोळीकर, डॉ. दिलीप कांबळे, डॉ. किशोर वाघ, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. बिटपल्लीवार, डॉ. कन्नमवार, डॉ. कुमरे, डॉ. साबणे, डॉ. गजानन बुरांडे, डॉ. प्रतिभा बांगर, डॉ. देवगडे, वेलदंडी, हरिदास कोटरंगे, नितीन बालमवार, कल्पना रामटेके, कांबळे, सुरेश गेडाम, रायपुरे, भटारकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)