कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:38 AM2021-07-30T04:38:45+5:302021-07-30T04:38:45+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत गडचिराेली जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास ३७ हजार ५७० शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा ...

Do you want to take out crop insurance to cover companies? | कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत गडचिराेली जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास ३७ हजार ५७० शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला आहे. विमा काढूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अपेक्षित विम्याची रक्कम मिळत नसल्याने प्रतिसाद कमी मिळत असल्याचे दिसून येते. दरम्यान प्रिमियमच्या माध्यमातून विमा कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीक विमा काढायचा का? असा प्रश्न जिल्ह्यातील अनेक शेतकरी करताना दिसून येत आहेत.

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना २३ जुलै २०२१ पर्यंत मुदत दिली हाेती. यापुढे सरकारच्या वतीने मुदत वाढल्यास पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये प्रभावी जनजागृती हाेणे आवश्यक आहे.

बाॅक्स ......

केवळ ३५ टक्केच विमा

गतवर्षी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला. मात्र नुकसान हाेऊनही विमा कंपन्यांकडून पुरेशी भरपाई मिळाली नाही. यंदा ३५ टक्केच शेतकऱ्यांनी विमा काढला.

काेट .....

यावर्षी आतापर्यंत केवळ सिराेंचा तालुक्यात १०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

- भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

बाॅक्स ....

कंपन्यांकडून वाईट अनुभव

माझ्याकडे साडेतीन एकर धानाची शेती आहे. गतवर्षी आपण धान पिकाची लागवड करून खरीप पिकांचा विमा काढला. शेवटच्या टप्प्यात पाऊस आल्याने धान पिकाचे नुकसान झाले. कापणी केलेल्या धानाच्या सरड्या ओल्या झाल्या. नुकसानीच्या तुलनेत विम्याची भरपाई मिळाली नाही.

- पंढरी किरंगे, शेतकरी

काेट ....

पंतप्रधान पीक विमा याेजनेंतर्गत खरीप पिकाला विमा देण्याची तरतूद आहे. मात्र कंपन्यांच्या जाचक अटीमुळे भरपाईची रक्कम फार कमी आहे. धान पीक लागवडीचा खर्च गेल्या दाेन वर्षात प्रचंड वाढला आहे. त्यातल्या त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे धान व इतर पिकांची नुकसान हाेत असते.

- वासुदेव मडावी, शेतकरी

बाॅक्स ...

जिल्ह्यातील एकूण शेतकरी

५२९६७

पीक विमा काढलेले शेतकरी

गतवर्षी - २४१२२

यावर्षी - ३७५७०

Web Title: Do you want to take out crop insurance to cover companies?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.