पालिका निवडणुकीत गटबाजी, बंडखोरी करू नका

By Admin | Updated: November 14, 2016 02:04 IST2016-11-14T02:04:22+5:302016-11-14T02:04:22+5:30

कार्यकर्ता हा भाजप पक्षाचा कणा आहे. कार्यकर्ता हा सैनिक असल्याने तो पक्षासाठी सातत्याने झटणारा असावा.

Do not stigmatize in municipal elections, do not rebel | पालिका निवडणुकीत गटबाजी, बंडखोरी करू नका

पालिका निवडणुकीत गटबाजी, बंडखोरी करू नका

मंचर : ‘‘ देशात आणि राज्यांत जातीयवादी सरकार आले आहे. जातीजातीत भांडणे लावण्याचे काम चालू आहे हे आपण ओळखले पाहिजे. जातीयवाद्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर, राज्यघटनेवर भारत देश कारभार करत आहे, याची नोंद संपूर्ण जगाने घेतली आहे,’’ असे प्रतिपादन आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग आंबेगाव तालुका यांचा पदनियुक्ती सोहळा तसेच जुन्नर, आंबेगाव व खेड तालुका कार्यकर्ता मेळावा मंचर येथे पार पडला. यावेळी आंबेगाव तालुक्यातील सुमारे ८६ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षस्थानावरून वळसे पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार जयदेव गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब बाणखेले, बाजार समितीचे उपाध्यक्ष गणपतराव इंदोरे, गौतम रोकडे, नविन सोनवणे, दत्ता साळवे, संतोष देठे, महेंद्र देठे, नितीन भद्रिगे, शैलेश गायकवाड, प्रशांत थोरात, विजय अभंग, सचिन लोखंडे, गणेश वाव्हळ, गणेश सोनवणे, अविनाश कांबळे, संग्राम सोनवणे,वृषभ माळी, सचिन सातेकर, रवि शेगर, सचिन नाईकनवरे, विवेक वळसे, विष्णू काका हिंगे, राजन अभंग, सूरज लोखंडे उपस्थित होते. आमदार जयदेव गायकवाड म्हणाले, महाराष्ट्र राज्यात सामाजिक न्याय विभागाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. सुशिक्षित व सक्षम कार्यकत्र्यांची नविन भरभक्कम फळी उभी रहात आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र बडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

Web Title: Do not stigmatize in municipal elections, do not rebel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.