नक्षलवाद्यांना थारा देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:35 IST2018-04-02T00:35:44+5:302018-04-02T00:35:44+5:30
नक्षल कारवायांना रोखण्यासाठी सरकारने १९९१ मध्ये सीआरपीएफच्या ११३ बटालियनची स्थापना केली. या बटालियनतर्फे स्थानिक नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, असे सांगत नागरिकांनी नक्षलवाद्यांना थारा देऊ नये, ....

नक्षलवाद्यांना थारा देऊ नका
लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : नक्षल कारवायांना रोखण्यासाठी सरकारने १९९१ मध्ये सीआरपीएफच्या ११३ बटालियनची स्थापना केली. या बटालियनतर्फे स्थानिक नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, असे सांगत नागरिकांनी नक्षलवाद्यांना थारा देऊ नये, असे आवाहन सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवशंकरा यांनी केले.
सीआरपीएफच्या ११३ बटालियनच्या स्थापनेला २७ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त धानोरा येथील सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये रविवारी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला सीआरपीएफच्या ११३ बटालियनचे अधिकारी के. डी. जोशी, द्वितीय कमान अधिकारी जे. पी. सॅमुअल, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रंजीत पाटील, सहायक कमांडंट रोहतास कुमार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण मिश्रा यांच्यासह सीआरपीएफचे जवान उपस्थित होते. यावेळी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.