बाबासाहेबांना देव बनवून कर्मकांडात गुरफटू नका

By Admin | Updated: October 26, 2015 01:25 IST2015-10-26T01:25:22+5:302015-10-26T01:25:22+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देव बनवून कर्मकांडात गुरफटू नका, असे आवाहन चंद्रपूर येथील नरेन गेडाम यांनी केले.

Do not make the Babasaheb God a God-fearing person | बाबासाहेबांना देव बनवून कर्मकांडात गुरफटू नका

बाबासाहेबांना देव बनवून कर्मकांडात गुरफटू नका

नरेन गेडाम : नवेगावात धम्मचक्र प्रवर्तन दिन
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देव बनवून कर्मकांडात गुरफटू नका, असे आवाहन चंद्रपूर येथील नरेन गेडाम यांनी केले. नवेगाव येथील सम्यक बुद्ध विहारात ५९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आरटीओ निरीक्षक बन्सोड, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात ठमके, शोभा खोब्रागडे, विशाखा म्हशाखेत्री यांनी बुद्ध पूजनाने केली. त्यानंतर दिवंगत प्रा. गेडाम, देवगडे यांना आदरांजली वाहण्यात आली. आपल्या पाल्यांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना सुशिक्षित करण्याचे आवाहन बन्सोड यांनी केले. तर शिंदे यांनी विहारात सुसज्ज ग्रंथालय निर्माण करण्याचा आशावाद व्यक्त केला. यावेळी वामन गेडाम यांचे बुद्ध, भीमगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाला विजय पाटील, बोरकर, धम्ममित्र ठमके उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. बांबोळे, संचालन दहीवले तर आभार शेंडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Do not make the Babasaheb God a God-fearing person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.