वाघिणीला जिल्ह्यात सोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:45 IST2017-08-27T23:44:35+5:302017-08-27T23:45:05+5:30
आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा येथील जंगलातून पकडण्यात आलेल्या वाघिणीला पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात सोडू नये,

वाघिणीला जिल्ह्यात सोडू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा येथील जंगलातून पकडण्यात आलेल्या वाघिणीला पुन्हा गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात सोडू नये, अशी मागणी दी महाराष्टÑ स्टेट को आॅपरेटीव्ह बँकेचे उपाध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, नरभक्षी वाघिणीला पकडण्याची मागणी झाल्यानंतर १२ आॅगस्ट रोजी वनाधिकाºयांनी रवी व अरसोडा गावादरम्यानच्या कक्ष क्रमांक ६७ मधील जंगलात वाघिणीला पकडले. त्यानंतर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तिची रवानगी करण्यात आली होती. यानंतर वन्यजीव वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या अध्यक्षतेखालील वन्यजीव तज्ज्ञांच्या समितीने पकडण्यात आलेली वाघिण नरभक्षी नाही, असा निष्कर्ष काढला. त्यामुळे समितीने या वाघिणीला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा निर्णय घेतला. सदर वाघिणीला आता गडचिरोली जिल्ह्याच्या चपराळा अभयारण्यात सोडण्याचा विचार सुरू आहे. आरमोरी परिसरात आधीच एक वाघ असून त्याची दहशत आहे. सोबतची वाघिण नसल्याने तो पुन्हा चवताळणार आहे. अशा परिस्थितीत पकडलेल्या वाघिणीला पुन्हा याच जिल्ह्यात सोडणे योग्य होणार नाही. वाघिणीला येथील जंगलात सोडल्यास बफर झोन निर्माण होईल व नागरिकांचे जगणे कठीण होईल, असे पोरेड्डीवार यांनी म्हटले आहे.
चपराळा व गडचिरोली जिल्ह्याच्या अन्य भागातील नागरिक वस्तीचे प्रमाण लक्षात घेता वन्यप्राणी व मानव यांच्यातील संघर्ष तीव्र होणार नाही. याकरिता शासन, प्रशासन व स्थानिक जनता यांच्यात सुसंवाद साधण्याच्या दृष्टीने एका अभ्यासगटाची निर्मिती करावी, अशी मागणी अरविंद पोरेड्डीवार यांनी शासनाकडे केली आहे. यासाठी वन विभागाने पुढाकार घ्यावा.