शिक्षकांना बीएलओचे काम देऊ नका
By Admin | Updated: October 15, 2015 01:43 IST2015-10-15T01:43:10+5:302015-10-15T01:43:10+5:30
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याच्या कामासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशावरून तालुका प्रशासनाने तालुक्यातील ...

शिक्षकांना बीएलओचे काम देऊ नका
तहसीलदारांना निवेदन : प्राथमिक शिक्षक समितीची मागणी
चामोर्शी : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याच्या कामासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्देशावरून तालुका प्रशासनाने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील अनेक शिक्षकांची प्रगणक म्हणून नेमणूक केली आहे. या कामात शिक्षक गुंतणार असल्याने शाळा व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीच्या बीएलओच्या कामातून वगळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा चामोर्शीच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यू. जी. वैद्य यांना मंगळवारी निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, १० आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत प्रगणक म्हणून नेमण्यात आलेल्या शिक्षकांना घरोघरी जाऊन नोंदवही अद्यावत करावयाची आहे. सध्य:स्थितीत शिक्षक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम, सरलची माहिती भरणे, मूल्यमापनाच्या नोंदणी ठेवणे आदी कामात व्यस्त आहेत. निवेदन देताना राजेश बाळराजे, संजय लोणारे, पुरूषोत्तम पिपरे उपस्थित होते.