अडचणींवर जि. प. उपाध्यक्षांशी चर्चा
By Admin | Updated: March 20, 2015 01:27 IST2015-03-20T01:27:38+5:302015-03-20T01:27:38+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षकांनी आपल्या १९ समस्यांवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट यांच्याशी १८ मार्च रोजी चर्चा केली.

अडचणींवर जि. प. उपाध्यक्षांशी चर्चा
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत शिक्षकांनी आपल्या १९ समस्यांवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन पाटील नाट यांच्याशी १८ मार्च रोजी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक संघाच्यावतीने जनगणनेचे काम केलेल्या शिक्षकांचे सेवा पुस्तकात सदर नोंद घेऊन रजांचा लेखाजोखा ठेवणे, उन्हाळी सुट्यांमध्ये शासनाची इतर कामे करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहनभत्ता व इतर भत्ते अदा करण्याचे आदेश निर्गमित करावे, सहाव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते शिक्षकांच्या जीपीएफ खात्यात जमा करण्याचे आदेश निर्गमित करावे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा एक प्रतिनिधी जिल्हास्तरीय शिक्षण समितीवर आमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात यावा, शिक्षकाचे चटोपाध्याय व निवड श्रेणीचे प्रस्ताव वेळोवेळी मंजूर करून निर्गमित करावे, शिक्षक कायम झाल्याची नोंद त्याच्या सेवापुस्तकात नोंदवून त्याबाबतचे पत्र शिक्षकांपर्यंत देण्यात यावे, सेवानिवृत्त शिक्षकांची जीपीएफ व इतर रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याची कारवाई करण्यात यावी, आदी मागण्यांवर चर्चा झाली. (नगर प्रतिनिधी)