केंद्राकडून जिल्ह्याला मिळणार २५० ऑक्सिजन जनरेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:55+5:302021-04-20T04:37:55+5:30
बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य रेखा डोळस, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, ...

केंद्राकडून जिल्ह्याला मिळणार २५० ऑक्सिजन जनरेटर
बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, महिला आघाडीच्या प्रदेश सदस्य रेखा डोळस, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल रूडे, तसेच अन्य संबंधित अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.
खासदार अशोक नेते यांनी केंद्र सरकारकडे ऑक्सिजन जनरेटरची मागणी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून २५० ऑक्सिजन जनरेटरचा पुरवठा गडचिरोली जिल्ह्यासाठी होणार असून लवकरच ऑक्सिजन जनरेटर जिल्ह्याला मिळणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी सांगितली. तसेच रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा गडचिरोली जिल्ह्याला जास्तीत जास्त होण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देश खासदार अशोक नेते यांनी दिले. तथा कोरोना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करून जिल्ह्यातील मृत्युदर कमी करण्यासाठी नागरिकांना उचित आरोग्य सेवा पुरविण्याच्या सूचनाही यावेळी खा. नेते यांनी दिल्या.