कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:44+5:302021-08-12T04:41:44+5:30
या स्पर्धेमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा कराटे संघटनेचे उपाध्यक्ष रूपराज माकोडे हाेते. यावेळी प्रमुख पाहुणे एपीआय राहुल नामदे, एपीआय ...

कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
या स्पर्धेमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा कराटे संघटनेचे उपाध्यक्ष रूपराज माकोडे हाेते. यावेळी प्रमुख पाहुणे एपीआय राहुल नामदे, एपीआय पूनम गोरे, पत्रकार मिलिंद उमरे, नीलेश टाेंगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र वट्टी यांनी केले. अजिंक्यपद स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली, अहेरी, चामोर्शी व सिरोंचा येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये एकूण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ही स्पर्धा सबज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर व सिनिअर या वयोगटात व वजनात घेण्यात आली.
बाॅक्स
..असा आहे निकाल
सबज्युनिअर १४ वर्षांखालील मुले - वैयक्तिक काता ६ वर्षांखालील सुवर्णपदक श्लोक चव्हाण, रजतपदक अमय नामदे, वैयक्तिक कुमिते ६ वर्ष सुवर्णपदक अमय नामदे, रजत पदक श्लोक चव्हाण. ७ वर्षांखालील व्यक्तिगत काता/कुमितेमध्ये दक्ष टिगुसले सुवर्णपदक व रजत अयांश वासेकर. ८ वर्षांखालील वैयक्तिक काता/कुमितेमध्ये वेदांत देशमुख सुवर्णपदक मिळविले. १० वर्षांखालील वैयक्तिक कातामध्ये सुवर्णपदक अर्णव उंदीरवाडे, रजत रुद्राक्ष खांडरे, कांस्य वैभव वासनिकव अर्चित मेश्राम. १० वर्षांखालील वैयक्तिक कुमिते- सुवर्णपदक अर्णव उंदीरवाडे, रजत अर्चित मेश्राम, कांस्य साई बावनवाडे व रुद्राक्ष खांडरे तसेच १० ते ११ वर्षाच्या खालील वैयक्तिक कातामध्ये सुवर्णपदक आर्यन बावणे, रजत रोमन टिंगुसले, कांस्य सार्थक नेरकर व अर्जुन दिकोंडवार. १० ते ११ वर्षाखालील वैयक्तिक कुमितेमध्ये सुवर्णपदक सार्थक नेरकर, रजत आर्यन बावणे, कास्य रोमन टिंगुसले. १२ ते १३ वर्षाखालील वैयक्तिक कातामध्ये सुवर्ण सार्थक गेडाम, रजत समक्ष वाघमारे, कांस्य अथर्व चांदेकर व ओमकार तोलोडिकर. १२ ते १३ वर्षांमध्ये वैयक्तिक कुमिते सुवर्णपदक समक्ष वाघमारे, रजत सार्थक गेडाम व कांस्य ओमकार टोलोडिकर व अर्जुन दिकोंडवार. साई बावनवाडे सुवर्ण व निहार दुधबावरे याने रजत पदक मिळविले.
सबज्युनिअर मुली- ६ वर्षाखालील वैयक्तिक काता/कुमितेमध्ये सुवर्णपदक गुंजन बावणवाडे, रजत ऋतुजा पद्मागिरीवार. ७ वर्षाखालील वैयक्तिक कातामध्ये सुवर्णपदक अनन्या गायगोले, रजत श्रावणी उमरे, कास्य आराध्या वासनिक तसेच ७ वर्षाखालील वैयक्तिक कुमितेमध्ये सुवर्णपदक अनन्या गायगोले, रजत आराध्या वाचणे, कांस्य श्रावणी उमरे तसेच ८ वर्षाखालील वैयक्तिक कातामध्ये सुवर्णपदक स्वरा नेरकर, रजत श्रावणी कोहळे, कास्य आराध्या बेलखेडे व कास्य प्रज्ञा सहारे याशिवाय ८ वर्षाखालील कुमितेमध्ये सुवर्णपदक स्वरा नेरकर, रजत प्रज्ञा सहारे, कास्य आराध्या बेलखेडे व कास्य श्रावणी कोहळे. १० ते ११ ते १२ वर्षाखाली वैयक्तिक कातामध्ये सुवर्णपदक संस्कृती आरसोडे, रजत प्रचिती नामदे, कास्य चेतना वायलकर ११ वर्ष (बी.) वैयक्तिक काता मध्ये सुवर्णपदक आरोही चव्हाण, रजत स्वाती पलोजे, कास्य अनुष्का बिडकर, कास्य तेजल मडावी १० ते ११ वर्षाखाली वैयक्तिक कुमिते सुवर्णपदक आरोही चव्हाण, रजत पदक अनुष्का बिडकर, कांस्य पदक स्वास्ती पलोजे, कास्य तेजल मडावी, ११ ते १२ वर्षाखाली कुमिते वैयक्तिक सुवर्णपदक संस्कृती आरसोडे, रजत पदक प्रचिती नामदे व कास्य पदक चेतना वाईलकर यांनी मिळविले. १२ ते १३ वर्षाखालील वैयक्तिक काता व कुमिते सुवर्णपदक लावण्या कोवे, रजत आर्या बिडकर, कास्य धनश्री राऊत यांनी मिळविले.