जि. प. पोटनिवडणुकीत चारही पक्ष मैदानात
By Admin | Updated: August 13, 2016 01:51 IST2016-08-13T01:51:19+5:302016-08-13T01:51:19+5:30
तालुक्यातील कढोली-सावलखेडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी

जि. प. पोटनिवडणुकीत चारही पक्ष मैदानात
कढोली-सावलखेडा सर्कल : शक्तीप्रदर्शनानंतर नामांकन पत्र दाखल
कुरखेडा : तालुक्यातील कढोली-सावलखेडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी शेवटच्या दिवशी चार राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या समर्थकासह शक्तीप्रदर्शन करून नामांकन पत्र कुरखेडा तहसील कार्यालयात दाखल केले.
नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला) करिता राखीव असलेल्या या जिल्हा परिषद क्षेत्रात काँग्रेस पक्षातर्फे वर्षा हनुमंत गावतुरे यांनी नामांकन अर्ज दाखल केला. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट, हसनअली गिलानी, प्रभाकर तुलावी, महादेव नाकाडे, तालुका अध्यक्ष जयंत हरडे, सभापती शामिना उईके, जयश्री धाबेकर, गीता धाबेकर, आशा तुलावी, उस्मान पठाण, मनोज सिडाम, महादेव पुंगळे, मिलींद खोब्रागडे, अमोल पवार, धनराज लाकडे, सुधाकर भेंडे आदी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने गायत्री ऋषीकेश आकरे यांनी नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी आ. क्रिष्णा गजबे, नाना नाकाडे, तालुकाध्यक्ष राम लांजेवार, पं. स. सदस्य चांगदेव फाये, विलास गावंडे, रवींद्र गोटेफोडे, कढोलीचे सरपंच चंंद्रकांत चौखे उपस्थित होते. शिवसेनेतर्फे अश्विनी जगदीश गावतुरे यांनी नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, नगराध्यक्ष डॉ. महेंद्र मोहबंशी, उपसभापती बबन बुद्धे, जि. प. सदस्य निरांजनी चंदेल, तालुका प्रमुख आशिष काळे, नरेंद्र तिरनकर, नगरसेवक सोनू भट्टड, अनिता बोरकर, चित्रा गजभिये, कविता खडसे, राकेश चव्हाण आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने योगीता श्यामकांत बोरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आ. हरिराम वरखडे, जिल्हा सचिव श्याम धाईत, तालुकाप्रमुख दादा प्रधान, शहर प्रमुख अयुब खान, नगरसेवक अर्चना वालदे, टेटू नाकाडे, किशोर तलमले, युनूस शेख, गितेश जांभुळे आदी उपस्थित होते. १६ आॅगस्ट रोजी अर्जाची छाननी होऊन चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. या सर्व उमेदवारांनी तहसीलदार अजय चरडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेत. (तालुका प्रतिनिधी)
काँग्रेसला अपक्षाने दिली होती लढत
कढोली-सावलखेडा जिल्हा परिषद गणात सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या सरिता वाटगुरे निवडून आल्या होत्या. या निवडणुकीत त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. आर. आकरे यांनी या मतदार संघात लढविलेल्या अपक्ष उमेदवारासोबत झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला ही जागा राखण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.